Bns 2023 कलम १७२ : निवडणुकांमध्ये तोतयेगिरी करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १७२ :
निवडणुकांमध्ये तोतयेगिरी करणे :
जो कोणी अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावाने मग ती हयात असो वा मृत असो – किंवा कल्पित नावाने निवडणुकीमध्ये मतपत्रिका मागतो किंवा मतदान करतो अगर अशा निवडणुकीत एकदा मतदान केले असता जो त्याच निवडणुकीत स्वत:च्या नावाने मतपत्रिका मागतो आणि जो कोणी कोणत्याही व्यक्तीकडून अशा प्रकारे मतदार होण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देतो किंवा तसे योजून आणतो किंवा योजून आणण्याचा प्रयत्न करतो, तर त्याने तोतयागिरी करण्याचा अपराध केला असे होते :
परंतु असे की, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये एखाद्या मतदाराची बदली व्यक्ती म्हणून जिला प्राधिकृत करण्यात आले असेल अशी ती जितपत अशा मतदाराची बदली व्यक्ती म्हणून मतदान करीत असेल तितपत या कलमातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही.

This Post Has One Comment

Leave a Reply