भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १६१ :
भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला त्यांचे वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावत असताना त्यांच्यावर हमला करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :
कलम : १६१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला त्याचा वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावत असताना त्याच्यावर हमला करण्यास अपप्रेरणा देणे.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी
———
जो कोणी भारत सरकारच्या भूसेनेतील, नौसेनेतील किंवा वायुसेनेतील अधिकाऱ्यांना, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला कोणताही वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावीत असताना त्यांच्यावर हमला करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल तर त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
Pingback: Ipc कलम १३३ : भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला..