भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १५६ :
राजकैद्याला अगर युध्दकैद्याला पळून जाण्यास लोकसेवकाने इच्छापूर्वक मुभा देणे :
कलम : १५६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाने आपल्या हवालतीतील राजकैदद्याला किंवा युद्धकैद्यला पळून जाण्यास इच्छापूर्वक मुभा देणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा करावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
जो कोणी लोकसेवक असून, आणि त्याच्याकडे कोणत्याही राजकैद्याचा किंवा युध्दकैद्याचा ताबा असतो (हवालत ) आणि जेथे अशा कैद्याला बंदिवासात ठेवले असेल, अशा कोणत्याही ठिकाणाहून अशा कैद्यास पळून जाण्यास इच्छापूर्वक मुभा देईल तर, त्यास आजिवन कारावासाची, किंवा दहा वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.