भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १५५ :
कलम १५३ आणी १५४ या मध्ये उल्लेखिल्याप्रमाणे युध्दात किंवा लूटमारीत हस्तगत झालेली मालमत्ता स्वीकारणे:
कलम : १५५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : १५३ व १५४ या कलमांमध्ये उल्लेखिल्याप्रमाणे युद्धात किंवा लूटमारीत हस्तगत झालेली मालमत्ता स्वीकारणे.
शिक्षा : ७ वर्षांचा करावास व द्रव्यदंड, आणि काही मालमत्ता जप्त
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
जो कोणी एखादी मालमत्ता कलम १५३ व १५४ या कलमांमध्ये उल्लेखिलेल्यांपैकी कोणताही अपराध करताना हस्तगत करण्यात आलेली आहे हे माहीत असताना ती स्वीकारील, तर त्यास सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्यदंड, व याप्रमाणे स्वीकारलेली मालमत्ता सरकारजमा होण्यास तो पात्र होईल.
Pingback: Ipc कलम १२७ : वर कलम १२५,१२६ या कलमांमध्ये उल्लेखिल्या