Bns 2023 कलम १५३ : भारत सरकारशी मैत्री संबंध असलेल्या कोणत्याही विदेशी राज्याविरूध्द युध्द करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १५३ :
भारत सरकारशी मैत्री संबंध असलेल्या कोणत्याही विदेशी राज्याविरूध्द युध्द करणे :
कलम : १५३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारत सरकारशी सलोख्याचे किंवा शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही विदेशी राज्य विरुद्ध युद्ध करणे.
शिक्षा : आजीवन कारावास व द्रव्यदंड, किंवा ७ वर्षांचा करावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
जो कोणी भारत सरकारशी मैत्रीचे किंवा शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही विदेशी राज्याच्या शासनाविरूध्द युध्द करील, किंवा असे युद्ध करण्याचा प्रयत्न करील, किंवा असे युद्ध करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल त्याला, आजिवन कारावासाची शिक्षा होईल व तिच्या जोडीला त्याच्यावर द्रव्यदंड लादता येईल, किंवा सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तिच्या जोडीला त्याच्यावर द्रव्यदंड लादता येईल, किंवा द्रव्यदंडाची शिक्षा होईल.

Leave a Reply