भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १४८ :
कलम १४७ अन्वये शिक्षापात्र असे अपराध करण्याचा कट :
कलम : १४८
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : देशाविरुद्ध विवक्षित अपराध करण्याचा कट करणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा करावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
जो कोणी कलम १४७ अन्वये शिक्षापात्र असलेल्यांपैकी कोणताही अपराध करण्याचा कट भारताच्या आत किंवा बाहेर आणि भारताबाहेर करील, अथवा केंद्र शासनास, किंवा कोणत्याही राज्य शासनास फौजदारीपात्र बलप्रयोगाद्वारे किंवा फौजदारीपात्र बदप्रदर्शनाद्वारे (त्याचा देखावा करून) दहशत घालण्याचा कट करील त्याला आजन्म कारावासाची शिक्षा किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
कटाचा अपराध घडण्याकरिता, त्याला अनुसरून एखादी कृती किंवा अवैध अकृती घडून आली पाहिजे, अशी या कलमाखाली आवश्यकता नाही.
Pingback: Ipc कलम १२१ - अ : कलम १२१ अन्वये शिक्षापात्र असे अपराध..