Bns 2023 कलम १४० : खून करण्यासाठी किंवा खंडणी वगैरे करता अपनयन करणे किंवा अपहरण करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १४० :
खून करण्यासाठी किंवा खंडणी वगैरे करता अपनयन करणे किंवा अपहरण करणे :
कलम : १४० (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खून करण्यासाठी अपनयन करणे किंवा अपहरण करणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा सश्रम कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : १४० (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खंडणी वगैरेकरिता अपहरण.
शिक्षा : मृत्यू किंवा आजीवन कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : १४० (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गुप्तपणे व गैरपणे एखाद्या व्यक्तीला परिरुद्ध करण्याकरिता तिचे अपनयन किंवा अपहरण करणे.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
कलम : १४० (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीला जबर दुखापत पोचवणे तिला गुलाम बनवणे, इत्यादीसाठी तिचे अपनयन किंवा अपहरण करणे.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) एखाद्या व्यक्तीचा खून करता यावा किंवा खून होण्याच्या संकटात ती व्यक्ती सापडेल अशा प्रकारे तिची वासलात लावता यावी म्हणून जो कोणी अशा व्यक्तीचे अपनयन किंवा अपहरण करील त्याला, आजीवन कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम (कठोर) कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
उदाहरणे :
(a) क) (य) ला एका मूर्तीसमोर बळी देण्याच्या उद्देशाने किंवा तसे होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना (क) हा (य) भारतातून अपनयन करतो. (क) ने या कलमामध्ये व्याख्या करण्यात आलेला अपराध केला आहे.
(b) ख) (ख) चा खून करता यावा म्हणून (क) हा (ख) ला बळजबरीने त्याच्या घरापासून दूर घेऊन जातो किंवा त्याला भूरळ पाडून नेतो. (क) ने या कलमामध्ये व्याख्या करण्यात आलेला अपराध केला आहे.
२) जो कोणी कोणत्याही व्यक्तीला चोरुन नेतो म्हणजे त्याचे अपनयन करता अगर पळवून नेतो म्हणजे अपहरण करतो. किंवा असे केल्यावर त्या व्यक्तीस कैदेत डांबून ठेवतो आणि मग त्याला ठार मारण्याची किंवा दुखापत करण्याची धमकी देतो. अगर अशा प्रकारची वागणूक देतो की त्या व्यक्तीला वाजवी रीतीने भीती वाटते की त्याचा मृत्यू होईल अगर त्याला दुखापत होईल अगर त्या व्यक्तीस दुखापत करतो अगर ठार मारतो आणि असे करण्यामागे सरकारवर अगर कोणत्याही परकीय सरकारवर अगर आंतरदेशीय आंतर सरकारी संस्थेवर अगर इतर कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाते की त्यांनी एखादे कृत्य करावे अगर एखादे कृत्य करु नये अगर खंडणी द्यावी, असे केल्यास तो मृत्यूच्या अगर आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
३) एखादी व्यक्ती गुप्तपणे व गैरपणे परिरुद्ध व्हावी (अटकेत ठेवणे) या हेतूने जो कोणी त्या व्यक्तीचे अपनयन किंवा अपहरण करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
४) कोणतीही व्यक्ती जबर दुखापत किंवा गुलामगिरी किंवा एखाद्या व्यक्तीची अनैसर्गिक कामतृष्णा यांना बळी पडावी अथवा ती अशा प्रकारच्या संकटात पडेल अशी तिची वासलात लावता यावी म्हणून अथवा अशी व्यक्ती याप्रमाणे बळी पडेल किंवा तशी तिची वासलात लागेल असा संभव असल्याची स्वत:ला जाणीव असताना जो कोणी अशा व्यक्तीचे अपनयन किंव अपहरण करील त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply