Bns 2023 कलम १३९ : भीक मागण्यासाठी बालकाचे अपनयन करणे किंवा तिला विकलांग करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १३९ :
भीक मागण्यासाठी बालकाचे अपनयन करणे किंवा तिला विकलांग करणे :
कलम : १३९ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भीक मागण्यासाठी बालकाचे अपनयन करणे.
शिक्षा : कमीत कमी १० वर्षाचा कठोर कारावास परंतु आजिवन कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : १३९ (२)
अपराध : भीक मागण्यासाठी बालकाला विकलांग करणे.
शिक्षा : कारावास जो २० वर्षापेक्षाकमी नसेल जो त्या व्यक्तीच्या उर्वरित नैसर्गित आयुष्यापर्यंत असेल व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) कोणत्याही बालकास भीक मागण्याच्या कामी नेमता यावे किंवा त्यासाठी त्याचा वापर करता यावा याकरिता जो कोणी अशा बालकाचे अपनयन करील किंवा आपण बालकाचा कायदेशीर पालक नसताना त्या बालकाची अभिरक्षा मिळवील तो, दहा वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासा पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम (कठोर) कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
२) कोणत्याही बालकास भीक मागण्याच्या कामी नेमता यावे किंवा त्यासाठी तिचा वापर करता यावा याकरिता जो कोणी अशा बालकास विकलांग करील तो वीस वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावास पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी कारावासाची शिक्षा होईल आणि तो, द्रव्यदंडासही पात्र होईल.
३) आपण एखाद्या बालकाचा कायदेशीर पालक नसताना जर कोणी भीक मागण्याच्या कामी अशा बालकाची नेमणूक केली किंवा त्यासाठी तिचा वापर केला तर त्या बाबतीत, विरुद्ध शाबीत न झाल्यास, त्या बालकाला भीक मागण्यासाठी नेमता यावे किंवा त्यासाठी तिचा वापर करता यावा याकरिता त्याने अज्ञान व्यक्तीचे अपनयन केले किंवा अन्यथा तिची अभिरक्षा मिळवली असे गृहीत धरण्यात येईल.
४) या कलमात, भीक मागणे याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे :
एक) गाण्याचा, नाच करण्याचा, भविष्य सांगण्याचा, करामती करुन दाखवण्याचा किंवा वस्तूची विक्री करण्याचा किंवा अन्य प्रकारचा बहाणा करुन सार्वजनिक ठिकाणी भिकेची याचना करणे किंवा ती स्वीकारणे;
दोन) भीकेची याचना करण्यासाठी किंवा भीक स्वीकारण्यासाठी कोणत्याही खासगी परिवास्तूमध्ये प्रवेश करणे;
तीन) भीक मिळवण्याच्या किंवा उकळण्याच्या उद्देशाने, स्वत:चे किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचे किंवा एखाद्या प्राण्याचे कोणतेही क्षत, जखम, इजा, विद्रूपता किंवा रोग उघडा करणे किंवा त्याचे प्रदर्शन करणे;
चार) भिकेची याचना करणे किंवा भीक मिळवणे यासाठी प्रदर्शनीय वस्तू म्हणून अशा बालकाचा वापर करणे.

Leave a Reply