Bns 2023 कलम १२३ : अपराध करण्याच्या उद्देशाने विष, इत्यादींच्या साहाय्याने दुखापत पोचवणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १२३ :
अपराध करण्याच्या उद्देशाने विष, इत्यादींच्या साहाय्याने दुखापत पोचवणे :
कलम : १२३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दुखापत, इत्यादी पोचवण्याच्या उद्देशाने मूच्र्छाकारक औषधीदद्रव्य सेवन करण्यास देणे.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
अपराध करण्याच्या उद्देशाने किंवा अपराध करणे सुकर व्हावे या उद्देशाने किंवा आपण त्यामुळे दुखापतीस कारण होण्याची शक्यता आहे याची जाणीव असताना जो कोणी एखाद्या व्यक्तीला कोणतेही विष किंवा कोणतेही मूच्र्छाकारक, नशाकारक किंवा अपथ्यकारक औषधिद्रव्ये किंवा अन्य पदार्थ सेवन करण्यास देईल किंवा सेवन करवील त्याला, दहा वर्षेपर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply