Bns 2023 कलम १२१ : लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १२१ :
लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे :
कलम : १२१ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे.
शिक्षा : ५ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
कलम : १२१ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे.
शिक्षा : कमीत कमी १ वर्षाचा कारावास किंवा १० वर्षाचा कारावास आणि द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) लोकसेवक असलेली कोणतीही व्यक्ती असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडीत असताना अथवा त्या व्यक्तीला किंवा अन्य कोणत्याही लोकसेवकाला असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या किंवा त्यापासून धाकाने परावृत करण्याच्या उद्देशाने अथवा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना त्या व्यक्तीने केलेल्या किंवा करण्याचा प्रयत्न केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या परिणामी जो कोणी तिला इच्छापूर्वक दुखापत पोचवील त्याला, पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
२) लोकसेवक असलेली कोणतीही व्यक्ती असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडीत असताना अथवा त्या व्यक्तीला किंवा अन्य कोणत्याही लोकसेवकाला असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या किंवा त्यापाूसन धाकाने परावृत्त करण्याच्या उद्देशाने अथवा असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना त्या व्यक्तीने केलेल्या किंवा करण्याचा प्रयत्न केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या परिणामी, जो कोणी तिला इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवील त्याला, एक वर्षापेक्षा कमी नसेल परंतु दहा वर्षांपर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व ता द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply