भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १२० :
कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोचवणे :
कलम : १२० (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कबुलीजबाब किंवा माहिती जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता, इत्यादी परत करण्यास भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : १२० (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कबुलीजबाब किंवा माहिती जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता, इत्यादी परत करण्यास भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत पोेचवणे.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जर कोणी एखाद्या व्यक्तीला इच्छापूर्वक दुखापत पोचवली आणि त्यामागे, एखाद्या अपराधाचा किंवा गैरवर्तणुकीचा ज्यामुळे तपास लागू शकेल असा कोणताही कबुलीजबाब किंवा माहिती पीडित व्यक्ती किंवा तिच्यामध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही व्यक्ती यांच्याकडून जबरीने घेण्याचा इरादा असेल अथवा कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा परत करण्यास किंवा परत करवण्यास अगर कोणतीही हक्कमागणी किंवा मागणी पूर्ण करण्यास अगर जीमुळे कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा परत मिळू शकेल अशी माहिती देण्यास पीडित व्यक्ती किंवा तिच्यामध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही व्यक्ती यांना जबरीने भाग पाडण्याचा इरादा असेल तर त्याला, सात वर्षेपर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
उदाहरणे :
(a) क) (क) हा पोलीस अधिकारी, (य) ला त्याने अपराध केला असे कबूल करण्यास प्रवृत्त करण्यासाठी छळ करतो. (क) हा या कलमाखाली अपराधाबद्दल दोषी आहे.
(b) ख) (क) हा पालीस अधिकारी, विवक्षित चोरीची मालमत्ता कोठे ठेवली आहे हे दाखवून देण्यास (ख) ला प्रवृत्त करण्याकरिता त्याचा छळ करतो. (क) हा या कलमाखाली अपराधाबद्दल दोषी आहे.
(c) ग) (क) हा महसूल अधिकारी, (य) कडून येणे असलेल्या महसुलाची विवक्षित थकबाकी चुकती करण्यास (य) ला भाग पाडण्याकरिता त्याचा छळ करतो. (क) हा या कलमाखालील अपराधाबद्दल दोषी आहे.
२) जो कोणी पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट कोणत्याही प्रयोजनासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचविल, त्याला आजीवन कारावास किंवा किंवा दहा वर्षेपर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.