Bns 2023 कलम ११० : सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ११० :
सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे :
कलम : ११०
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
अपराध : अशा कृतीमुळे कोणत्याही व्यक्तीला दुखोपत झाल्यास.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
ज्या उद्देशाने किंवा जाणिवेने आणि ज्या परिस्थितीत कोणी एखादी कृती केली असता मृत्यू घडून आला तर तो खून या सदरात न मोडणाऱ्या सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरेल अशा उद्देशाने किंवा जाणिवेने आणि तशा परिस्थितीत जो कोणी ती कृती करील त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील, आणि अशा कृतीमुळे कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली तर त्याला सात वर्षेपर्यंंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरण :
(क) गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारणामुळे (य) वर अशा परिस्थितीत पिस्तूल झाडतो की, जर तो त्यामुळे मृत्युस कारण झाला तर, तो खून या सदरात न मोडणाऱ्या सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी होऊ शकेल. या कलमामध्ये व्याख्या करण्यात आलेला अपराध (क) ने केलेला आहे.

Leave a Reply