भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १०९ :
खुनाचा प्रयत्न करणे:
कलम : १०९ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खुनाचा प्रयत्न करणे.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———-
अपराध : जर अशा कृतीमुळे कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली तर
शिक्षा : आजीवन कारावास किंवा यथाउपरोक्त.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———-
कलम : १०९ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आजीवन कारावास भोगत असेलेल्या व्यक्ती द्वारा खुनाचा प्रयत्न, जर दुखापत घडून आली.
शिक्षा : मुत्यु किंवा आजीवन कारावास याचा अर्थ त्या व्यक्तिच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित आयुष्याच्या कालावधीसाठी.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) ज्या उद्देशाने किंवा जाणिवेने आणि ज्या परिस्थितीत कोणी एखादी कृती केली असता मृत्यू घडून आला तर तो दोषी ठरेल तशा उद्देशाने किंवा जाणिवेने तशा परिस्थितीत, जो कोणी ती कृती करील त्याला दहा वर्षेपर्यत असू शकेल इत्यक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, व तो द्रव्यदंडासही पात्र होईल आणि जर अशा कृतीमुळे कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली तर, त्याला आजन्म कारावासाची अगर वर उल्लेखिलेल्या (म्हटलेल्या) कारावासाच्या शिक्षेस पात्र होईल.
२) पोटकलम (१) खाली अपराध करणारी एखादी व्यक्ती जर आजन्म कारावास भोगत असेल तर त्या प्रकरणी, जर दुखापत घडून आली तर त्या व्यक्तीला मृत्यूची किंवा आजीवन कारावासापर्यंत म्हणजे त्या व्यक्तिच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित आयुष्याच्या कालावधीसाठी शिक्षा होऊ शकेल.
उदाहरणे :
(a) क) (क) हा (य) ला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर अशा परिस्थितीत गोळी झाडतो की, जर त्यामुळे मृत्यू घडून आला तर (क) खुनाबद्दल दोषी होऊ शकेल. (क) या कलमाखालील शिक्षेस पात्र आहे.
(b) ख) कोवळ्या वयाच्या बालकाचा मृत्यु घडवून आणण्याच्या उद्देशाने (क) त्याला एका निर्जन ठिकाणी उघड्यावर टाकतो. त्यामुळे बालकाचा मृत्यु घडून आला नाही तरी, या कलमाद्वारे व्याख्या करण्यात आलेला अपराध (क) ने केला आहे.
(c) ग) (य) चा खून करण्याच्या उद्देशाने (क) एक बंदूक खरेदी करतो व तीत बार भरतो. (क) ने अद्याप अपराधध केलेला नाही. (क) हा (य) वर बंदूक झाडतो. या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराधध त्याने केलेला आहे, आणि जर अशा गोळीबारात त्याने (य) ला जखमी केले तर पोटकलम (१) च्या नंतरच्या भागाद्वारे उपबंधित केलेल्या शिक्षेस तो पात्र आहे.
(d) घ) (क) हा (य) ला विष देऊन त्याचा खून करण्याच्या उद्देशाने विष खरेदी करुन ते अन्नात मिसळतो. ते अन्न (क) कडे राहते. याकलमामध्ये व्याख्या करण्यात आलेला अपराध (क) ने अद्याप केलेला नाही. (क) ते अन्न (य) च्या टेबलावर ठेवतो किंवा (य) च्या टेबलावर ठेवण्यासाठी (य) च्या नोकराच्या स्वाधीन करतो. या कलमामध्ये व्याख्या करण्यात आलेला अपराध (क) ने केलेला आहे.