Bns 2023 कलम १०५ : खून या सदरात न मोडणाऱ्या (नसलेल्या) सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षा :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १०५ :
खून या सदरात न मोडणाऱ्या (नसलेल्या) सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षा :
कलम : १०५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खून या सदरात न मोडणारा सदोष मनुष्यवध, जर त्या कृतीमुळे मृत्यु झाल्या असेल ते मृत्य ओढवण्याच्या उद्देशाने केले असल्यास इत्यादी.
शिक्षा : आजन्म कारावास किंवा पाच वर्षापेक्षा कमी नसेल परंतु दहा वर्षे पर्यंत असु शकेल इतक्या कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्यदंडाची शिक्षा.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : १०५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : त्या कृतीमुळे मृत्यू घडून येण्याचा संभव आहे ही जाणीव असून, पण मृत्यू घडवून आणण्याचा उद्देश नसताना ती कृती केलली असेल तर
शिक्षा : आजन्म कारावास किंवा पाच वर्षापेक्षा कमी नसेल परंतु दहा वर्षे पर्यंत असु शकेल इतक्या कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्यदंडाची शिक्षा.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी खून या सदरात न मोडणारा (नसलेला) सदोष मनुष्यवध करील त्याला, ज्या कृतीमुळे मृत्यू घडून आला असेल ती कृती मृत्यू घडवून आणण्याच्या किंवा ज्यामुळे मृत्यू घडून येण्याचा संभव आहे अशी शारीरिक क्षती (दुखापत) करण्याच्या उद्देशाने केली असेल तर, आजन्म कारावास किंवा पाच वर्षापेक्षा कमी नसेल परंतु दहा वर्षे पर्यंत असु शकेल इतक्या मुदतीची दोन्हीपैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल; किंवा त्या कृतीमुळे मृत्यू घडून येण्याचा संभव आहे ही जाणीव असून, पण मृत्यू घडवून आणण्याचा किंवा जी मृत्यूला कारण होण्याचा संभव आहे अशी शारीरिक क्षती (दुखापत) घडवून आणण्याचा उद्देश नसताना ती कृती केलली असेल तर, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्हीपैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल.

Leave a Reply