शस्त्र अधिनियम १९५९
कलम ९ :
अल्पवयीन व्यक्ती व अन्य विवक्षित व्यक्ती यांनी अग्निशस्त्रे इत्यादी संपादन करण्यास किंवा कब्जात ठेवण्यास किंवा त्यांना ती विकण्यास किंवा त्याच्याकडे ती हस्तांतरित करण्यात मनाई :
१) या अधिनियमाच्या पूर्ववर्ती उपबंधांमध्य काहीही असले तरी,-
(a)क) (अ)एक) ज्या कोणत्याही व्यक्तीच्या वयास १.(एकविस वर्षे) पूर्ण झालेली नाहीत तिला, किंवा.
दोन) हिंसाचार किंवा नैतिक अध:पात अनुस्यूत असणाऱ्या कोणत्याही अपराधांबद्दल दोषसिद्धी होऊन जिला २.(कोणत्याही मुदतीची) कारावासाची शिक्षा देण्यात आली असेल त्या व्यक्तीला अशा शिक्षेची मुदत संपल्यानंतरच्या पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत कोणत्याही वेळी, किंवा
तीन) ३.(फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३) (१९७४ चा २) याच्या ८ व्या प्रकरणाखाली ज्या व्यक्तीला शांतता राखण्यासाठी किंवा चांगल्या वर्तणुकीसाठी एखादे बंधपत्र निष्पादित करण्याचा आदेश देण्यात आला असेल त्या व्यक्तीला त्या बंधपत्राच्या मुदतीतील कोणत्याही वेळी कोणतेही अग्निशस्त्र किंवा दारूगोळा संपादन करता येणार नाही, आपल्या कब्जात ठेवता येणार नाही किंवा बरोबर बाळगता येणार नाही;
(b)ख) (ब) कोणतीही व्यक्ती, –
एक) ज्या व्यक्तीला कोणतेही अग्निशस्त्र किंवा दारूगोळा संपादन करण्यास, कब्जात ठेवण्यास किंवा बरोबर बाळगण्यास खंड (क) खाली मनाई करण्यात आली आहे, किंवा
दोन) अशी विक्री, किंवा हस्तांतरण, किंवा असे रूपांतरण, दुरूस्ती, चाचणी झाली किंवा त्याचा वापर करून दाखवण्यात आला त्यावेळी ती विकल मनाची होती –
हे स्वत:ला माहीत आहे किंवा तसे समजण्यास कारण आहे अशा अन्य कोणत्याही व्यक्तीस कोणतेही अग्निशस्त्र किंवा दारूगोळा विकणार नाही किंवा हस्तांतरित करणार नाही किंवा तिच्याकरिता कोणतेही अग्निशस्त्र किंवा दारूगोळा रूपांतरील करू शकणार नाही. दुरूस्त करू शकणार नाही, त्याची चाचणी करू शकणार नाही, किंवा ते वापरून दाखवू शकणार नाही.
२) पोटकलम १) खंड क) उपखंड (१) मध्ये काहीही असले तरी, ज्या व्यक्तीने विहित वयोमर्यादा गाठली आहे अशा व्यक्तीस अग्निशस्त्राच्या वापराचे प्रशिक्षण चालू असताना विहित करण्यात येतील अशी अग्निशस्त्रे विहित शर्तीवर वापरता येतील :
परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या अग्निशस्त्रांच्या बाबतीत वेगवेगळ्या वयोर्मादा विहित करता येतील.
———
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ५ द्वारे सोळा वर्षे याऐवजी (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ५ द्वारे सहा महिन्यांहून कमी नाही इतक्या मुदतीची याऐवजी (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.
३. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ५ द्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८ याऐवजी (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.