Arms act कलम ६ : बंदुका आखूड करण्यासाठी किंवा नकली अग्निशस्त्रांचे खऱ्याखुऱ्या अग्निशस्त्रांमध्ये रूपांतर करता येण्यासाठी लायसन :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम ६ :
बंदुका आखूड करण्यासाठी किंवा नकली अग्निशस्त्रांचे खऱ्याखुऱ्या अग्निशस्त्रांमध्ये रूपांतर करता येण्यासाठी लायसन :
कोणत्याही व्यक्तिला या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या उपबंधानुसार दिलेले लायसन तिने धारण केल्याशिवाय अग्निशस्त्राची नळी आखूड करता येणार नाही किंवा नगली अग्निशस्त्रांचे खऱ्याखुऱ्या अग्निशस्त्रांमध्ये रुपांतर १.(किंवा शस्त्र नियम २०१६ उल्लेखिलेल्या अग्निशस्त्रांच्या प्रवर्गातून अन्य प्रवर्गा मध्ये रुपांतर)करता येणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमातील नकली अग्निशस्त्रे या शब्दप्रयोगाचा अर्थ, अग्निशस्त्रे असल्यासारखी दिसणारी कोणतीही वस्तू असा आहे. मग त्यातून कोणताही छर्रा, गोळी किंवा अन्य अन्य अस्त्र सोडता येणे शक्य असो अथवा नसो.
———–
१. २०१९ चा ४८ कलम ४ द्वारा (१४-१२-२०१९ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply