शस्त्र अधिनियम १९५९
कलम ४५ :
विवक्षित प्रकरणी अधिनियम लागू व्हावयाचा नाही :
पुढील गोष्टींस या अधिनियमातील काहीही लागू होणार नाही,–
(a)क)(अ) कोणत्याही समुद्रग्रामी जलयानावर किंवा वायुयानावर असलेली आणि अशा जलयानाच्या किंवा वायुयानाच्या सर्वसामन्य युद्धसामुग्रीचा भाग असलेली शस्त्रे व दारूगोळा;
(b)ख)(ब) एक) केंद्र शासनाच्या आदेशान्वये किंवा त्याखाल, किंवा
दोन) लोकसेवकाने असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य बजावण्याच्या ओघात, किंवा
तीन) राष्ट्रीय छात्र सेना अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३१) याखाली उभारलेल्या व राखलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या सदस्याने, किंवा स्थल सेना अधिनियम, १९४८ (१९४८ चा ५६) याखाली उभारलेल्या व राखलेल्या स्थलसेनेच्या अधिकाऱ्याने किंवा त्यात नाव नोंदलेल्या व्यक्तीने अथवा कोणत्याही केंद्रीय अधिनियमानुसार उभारण्यात व राखण्यात आलेल्या किंवा यानंतर उभारण्यात व राखण्यात येईल अशा कोणत्याही सेनेच्या कोणत्याही सदस्याने किंवा केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अन्य सेनेच्या कोणत्याही सदस्याने, असा सदस्य अधिकारी किंवा नाव नोंदलेली व्यक्ती म्हणून आपली कामगिरी बजावण्याच्या ओघात शस्त्रे किंवा दारूगोळा यांचे संपादन करणे, ती कब्जात ठेवणे किंवा आपल्याबरोबर बाळगणे, त्यांची निर्मिती, दुरूस्ती, रूपांतर किंवा चाचणी करणे किंवा ती वापरून दाखवणे, त्यांची विक्री किंवा हस्तांतरण करणे किंवा आयात, निर्यात किंवा वाहतूक करणे;
(c)ग)(क) जे दुरूस्त करूनही अथवा न करताही अग्निशस्त्र म्हणून वापरता येण्याजोगे नाही असे अप्रचलित नमुन्याचे किंवा पुरातत्त्वदृष्ट्या मोलाचे किंवा नादुरूस्त स्थितीतील कोणतेही आयुध;
(d)घ)(ड) एखाद्या व्यक्तीने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने संपादन केलेल्या किंवा कब्जात ठेवलेल्या संपूरक भागांसह वापरण्याचे उद्देशित नसलेल्या शस्त्रांचे किंवा दारूगोळ्याचे किरकोळ भाग त्या व्यक्तीने संपादन करणे, ते कब्जात ठेवणे किंवा बरोबर बाळगणे.