Arms act कलम ४४ : नियम करण्याची शक्ती :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम ४४ :
नियम करण्याची शक्ती :
१) केंद्र शासनास शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या उपबंधांची अंमलबजावणी करण्यासाठी नियम करता येतील.
२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या व्यापकतेस बाध न येता, अशा नियमांमध्ये पुढील सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही बाबींसाठी उपबंध करता येईल, त्या अशा:-
(a)क)(अ) लायसन प्राधिकरणांची नियुक्ती, अधिकारिता, नियंत्रण व कार्यधिकार १.(ती प्राधिकरणे ज्यांसाठी लायसन देऊ शकतात अशी क्षेत्रे आणि असे शस्त्रांचे आणि दारूगोळ्यांचे प्रवर्ग यांसुद्धा;)
(b)ख)(ब) लायसनाच्या मंजुरीसाठी किंवा नवीकरणासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना व तपशील आणि लायसनाच्या नवीकरणासाठी अर्ज करावयाचा असल्यास तो किती मुदतीच्या आत करावा लागेल:
(c)ग) (क)कोणत्याही नमुन्यात व कोणत्या शर्तीच्या अधीनतेने कोणतेही लायसन मंजूर करावे लागेल, नाकारता येईल, त्याचे नवीकरण करता येईल, त्यात बदल करता येईल, ते निलंबित किंवा प्रत्याहृत करता येईल;
(d)घ) (ड) या अधिनियमात जेथे कोणताही कालावधी विनिर्दिष्ट करण्यात आलेला नसेल तेथे, कोणतेही लायसन कितीही कालावधीपुरते अंमलात असण्याचे चालू राहील;
(e)ङ)(इ) लायसनाच्या मंजुरीसाठी किंवा नवीकरणासाठी करावयाच्या कोणत्याही अर्जाच्या संबंधात किंवा मंजूर केलेल्या किंवा नवीकरण केलेल्या कोणत्याही लायसनाच्या संबंधात द्याावयाची फी आणि ती देण्याची रीत:
(f)च) (फ)२.(ज्या पद्धतीने शस्त्रे किंवा दारूगोळा त्यांच्या मदतीने शोधला जातो) अग्निशस्त्र बनवणाऱ्याचे नाव, त्याच्या निर्माणकाचा क्रमांक किंवा अन्य ओळख चिन्ह त्यावर कशा रीतीने ठेवण्यात येईल किंवा अन्यथा दर्शवण्यात येईल;
३.(स्पष्टीकरण :
या कलमाच्या उद्देशाने, शोध म्हणजे बेकायदेशीर उत्पादन आणि बेकायदेशीर व्यापार शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी, उत्पादकापासून खरेदीदारापर्यंत बंदुक आणि दारूगोळा यांचा नियोजित शोध;)
(g)छ)(ग) कोणत्याही अग्निशस्त्रांची चाचणी किंवा ती वापरून दाखवण्याची कार्यपद्धती;
(h)ज)(ह) प्रशिक्षण चालू असताना वापरता येतील ती अग्निशस्त्रे, ती ज्यांना वापरता येतील त्या व्यक्तींची वयोमर्यादा आणि अशा व्यक्तींनी त्यांचा वापर करण्यासंबंधातील शर्ती.
(i)झ)(आय) ज्याच्याकडे कलम १८ खाली अपिले करता येतील ती प्राधिकरण, अशा प्राधिकरणाने अनुसरावयाची कार्यपद्धती आणि ज्या कलावाधीत अपिले करावी लागतील तो कालावधी, अशा अपिलासंबंधात द्यावयाची फी आणि अशा फीचा परतावा;
(j)ञ)(जे) कलम ३ किंवा कलम ४ खालील लायसन सोडून अन्य लायसनाखाली केलेल्या कोणत्याही गोष्टींचे अभिलेख व हिशेब ठेवणे, असे अभिलेख किंवा हिशेब यांचा नमुना व त्यात करावयाच्या नोंदी आणि कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास किंवा याबाबतीत शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यास असे अभिलेख किंवा हिशेब दाखवणे;
(k)ट)(के)जेथे शस्त्रे किंवा दारूगोळा यांची निर्मिती करण्यात येते किंवा अशी शस्त्रे किंवा दारूगोळा यांची निर्मिती किंवा व्यापार करणाऱ्याने शस्त्रे किंवा दारूगोळा ठेवला असेल अशा कोणत्याही परिवास्तूमध्ये किंवा अन्य ठिकाणी, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा याबाबतीत शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने प्रवेश करून पाहणी करणे व अशा अधिकाऱ्यास ती शस्त्रे किंवा दारूगोळा दाखवणे;
(l)ठ)(एल) कलम २१ पोटकलम (१) द्वारे आवश्यक केल्याप्रमाणे एखाद्या लायसनधारक व्यापाऱ्याकडे किंवा पथक शस्त्रगारात शस्त्रे किंवा दारूगोळा कोणत्याही शर्तीच्या अधिनतेने निक्षेपित करता येईल आणि अशा प्रकारे निक्षेपित केलेल्या वस्तू किती कालावधी संपल्यावर समपहृत करता येतील;
(m)ड)(एम) विहित करावयाची किंवा करता येईल अशी अन्य कोणतीही बाब.
३) या अधिनियमानुसार केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, ते सत्रासीन असताना एका सत्राने किंवा ४.(दोन अगर अधिक क्रमवर्ती सत्रे मिळून बनलेल्या अशा एकूण तीस दिवसांच्या कालावधीपर्यंत ठेवला जाईल, आणि पूर्वोक्त सत्राच्या किंवा क्रमवर्ती सत्रांच्या पाठोपाठचे सत्र संपण्यापूर्वी जर) त्या नियमात कोणतेही आपरिवर्तन करण्याबाबत दोन्ही सभागृहांमध्ये मतैक्य झाले, किंवा तो नियम करण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहांचे प्रकरणपरत्वे, मुळीच परिणामक होणार नाही; तथापि अशा कोणत्याही आपरिवर्तनामुळे किंवा शून्यीकरणामुळे तत्पूर्वी त्या नियमाखाली करण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राह्यतेस बाध येणार नाही.
———–
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम १६ द्वारे मूळ मजकुराऐवजी (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ का अधिनियम सं. ४८ की धारा ११ द्वारा (१४-१२-२०१९ से) (वह रीति जिससे) शब्दों के स्थान प्रतिस्थापित ।
३. २०१९ का अधिनियम सं. ४८ की धारा ११ द्वारा (१४-१२-२०१९ से) अंत:स्थापित ।
४. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम १६ द्वारे (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply