शस्त्र अधिनियम १९५९
कलम ४२ :
अग्निशस्त्रांची गणती करण्याची शक्ती :
१) केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, कोणत्याही क्षेत्रातील सर्व अग्निशस्त्रांची गणती करण्याचा निदेश देऊ शकेल आणि अशी गणती करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला शक्ती प्रदान करू शकेल.
२) अशी कोणतीही अधिसूचना काढण्यात आल्यावर, ज्यांच्या कब्जात कोणतीही अग्निशस्त्रे आहेत अशा त्या क्षेत्रातील सर्व व्यक्ती, संबंधित अधिकाऱ्यास त्या संबंधात तो मागवील ती माहिती पुरवतील आणि त्याने तशी मागणी केल्यास अशी अग्निशस्त्रे त्याच्यापुढे हजर करतील.