शस्त्र अधिनियम १९५९
कलम ३८ :
अपराध दखली असावयाचे :
या अधिनियमाखालील प्रत्येक अपराध १.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३) (१९७४ चा २) यांच्या अर्थानुसार दखली अपराध असेल.
——–
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम १४ द्वारा फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८ या ऐवजी (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.