शस्त्र अधिनियम १९५९
कलम ३६ :
विवक्षित अपराधांबाबत माहिती द्यावयाची :
१) या अधिनियमानुसार कोणताही अपराध घडल्याची जाणीव असणारी प्रत्येक व्यक्ती वाजवी सबब नसल्यास, त्याची खबर सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास किंवा अधिकारिता असलेल्या दंडाधिकाऱ्यास देईल, व तशी सबब असल्यास तसे शाबीत करण्याचा भार अशा व्यक्तीवर राहील.
२) रेल्वे, वायुयान, जलयान, वाहन किंवा वाहतुकीचे अन्य साधन यात कामाला असलेली किंवा करत असलेली प्रत्येक व्यक्ती, ज्यांच्या बाबतीत या अधिनियमानुसार अपराध घडलेला आहे किंवा घडत आहे अशी शस्त्रे किंवा दारूगोळा ज्यात असावा असा संशय घेण्यास तिला कारण असेल असा मार्गक्रमरात असलेला कोणताही खोका, किंवा आवेष्टन किंवा गासडी याविषयीची खबर सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास देईल.