Arms act कलम २७ : १.(शस्त्रे, इत्यादी वापरण्यामद्दल शिक्षा :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम २७ :
१.(शस्त्रे, इत्यादी वापरण्यामद्दल शिक्षा :
१) कलम ५ चे व्यतिक्रमण करून जो कोणी, कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा यांचा वापर करील तो कमीत कमी तीन वर्षे परंतु सात वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासास आणि द्रवसंडासही पात्र होईल.
२) कलम ७ चे व्यतिक्रमण करून जो कोणी, कोणतीही मनाई केलेली शस्त्रे अथवा दारूगोळा यांचा वापर करील तो कमीत कमी सात वर्षे परंतु आजीव कारावासापर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासास आणि द्रव्यदंडासही पात्र असेल.
३) कलम ७ चे व्यतिक्रमण करून जो कोणी, कोणतीही मनाई केलेली शस्त्र अथवा दारूगोळा यांचा वापर करील किंवा कोणतीही कृती करील आणि असा वापर अथवा कृती अन्य कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत होईल त्याला २.(मृत्यूची किंवा आजीवन कारावास शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.))
———-
१. १९८८ चा अधिनियम क्रमांक ४२ याच्या कलम ६ द्वारा (२७-५-१९८८ पासून) कलम २७ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा ४८ कलम १० द्वारा (१४-१२-२०१९ पासून) (मृत्युची शिक्षा होईल) या शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply