Arms act कलम २५ : विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम २५ :
विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा :
१.(१) जो कोणी,-
(a)क)(अ) कलम ५ चे व्यतिक्रमण करून कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा यांची २.(निर्मिती, प्राप्त करणे,खरेदी करणे), विक्री, हस्तांतरण, रूपांतरण, दुरूस्ती, चाचणी करील किंवा ती वापरून दाखवील, अथवा विक्रीसाठी मांडील अथवा विकत देण्याची किंवा हस्तांतरित करण्याची तयारी दाखविल, अथवा विक्री, हस्तांतरण, रूपांतरण, दुरूस्ती, चाचणी करण्यासाठी किंवा ती वापरून दाखवण्यासाठी आपल्या कब्जात ठेवील, किंवा
(b)ख)(ब) कलम ६ चे व्यतिक्रमण करून अग्निशस्त्राची नळी आखूड करील किंवा नकली अग्निशस्त्राचे ख?्याखु?्या अग्निशस्त्रात रूपांतर करील ३.(किंवा शस्त्रास्त्र नियम २०१६ मध्ये नमूद केलेल्या अग्निशस्त्राच्या (बंदुक) कोणत्याही प्रवर्ग (श्रेणी) पासून इतर कोणत्याही प्रवर्गात रुपांतरीत करील;) किंवा
४.(***)
(d)घ)(ड) कलम ११ चे व्यतिक्रमण करून कोणत्याही वर्गाची किंवा वर्णनाची कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा भारतात आणील किंवा तेथून बाहेर नेईल;
तो, ५.(ज्याची मुदत कमीत कमी सात वर्षे असेल, परंतु जास्तीत जास्त आजीवन कारावासा पर्यंत असू शकेल अशा कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल) आणि तसेच द्रव्यदंडासही पात्र होईल.
(1A)६.(१क(अ) जो कोणी कलम ७ चे व्यतिक्रमण करून कोणतीही मनाई केलेली शस्त्रे किंवा मनाई केलेला दारूगोळा संपादन करील, आपल्या कब्जात ठेवील किंवा बरोबर बाळगील तो ७.(ज्याची मुदत कमीत कमी सात वर्षे असेल, परंतु जी चौदा वर्षापर्यंत वाढविता येईल), अशा कारावासाच्या शिक्षेस आणि द्रव्यदंडासही पात्र होईल :
३.(परंतु, न्यायालय निकालात नोंदवल्या जाणाèया कोणत्याही पुरेशा आणि विशेष कारणांसाठी, सात वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी कारावासाची शिक्षा देऊ शकेल.)
(1AB)३.(१कख(अब)) जो कोणी, बळाचा वापर करुन, पोलीस किंवा सशस्त्र दलाकडून अग्निशस्त्र (बंदुक) घेतो, त्याला कमीत कमी दहा वर्षे मुदतीचा परंतु आजीवन कारावासाच्या मुदतीपर्यंत वाढविता येईल अशी शिक्षा होऊ शकेल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.)
(1AA)१(कक(अअ)) कलम ७ चे व्यतिक्रमण करून कोणतीही मनाई केलेली शस्त्रे किंवा मनाई केलेला दारूगोळा, यांची निर्मिती, विक्री, हस्तांतरण रूपांतरण, दुरूस्ती, चाचणी करील अथवा वापरून दाखवील अथवा विक्रीकरता मांडील अथवा विकत देण्याची अथवा हस्तांतरित करण्याची तयारी दाखवील अथवा विक्री, हस्तांतरण, रूपांतरण, दुरूस्ती, चाचणी करण्यासाठी अथवा वापरून दाखविण्यासाठी आपल्या कब्जात ठेवील तो ८.(दहा वर्षापेक्षा) कमी नाही परंतु आजीव कारावासापर्यंत वाढविता येईल, अशा कारावासाच्या शिक्षेस आणि द्रव्यदंडास पात्र होईल.)
(1AAA)९.(१.(ककक(अअअ))) जो कोणी, कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा कलम २४ क अन्वये काढलेल्या अधिसूचनेचे व्यतिक्रमण करून आपल्या कब्जात ठेवील किंवा कलम २४ ख खाली काढलेल्या अधिसूचनेचे व्यतिक्रमण करून ते बरोबर बाळगील किंवा अन्य प्रकारे आपल्या कब्जात ठेवील तो, ज्याची मुदत कमीत कमी १०.(तीन वर्षे असेल, परंतु जास्तीत जास्त सात वर्षे) असू शकेल अशा कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल आणि तसेच द्रव्यदंडासही पात्र होईल.
(1B)१ख(ब)) जो कोणी –
(a)क)(अ) कलम ३ चे व्यतिक्रमण करून कोणतेही अग्निशस्त्र किंवा दारूगोळा संपादन करील आपल्या कब्जात ठेवील किंवा बरोबर बाळगील; किंवा
(b)ख)(ब) कलम ४ खालील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही ठिकाणी, त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या वर्गापैकी किंवा तशा वर्णनाची कोणतीही शस्त्रे त्या कलमाचे व्यतिक्रमण करून संपादन करील किंवा आपल्या कब्जात ठेवील किंवा बरोबर बाळगील; किंवा
(c)ग)(क) कलम ८, पोटकलम (२) द्वारे आवश्यक करण्यात आल्याप्रमाणे ज्या अग्निशस्त्रावर बनविणा?्याचे नाव, निर्माणकाचा क्रमांक किंवा अन्य ओळखचिन्ह ठसवलेले किंवा अन्यथा दर्शवण्यात आलेले नाही असे कोणतेही अग्निशस्त्र विकेल किंवा हस्तांतरित करील; किंवा
(d)घ)(ड) स्वत:, कलम ९, पोटकलम (१) खंड (क) उपखंड (दोन) किंवा उपखंड (तीन) जिला लागू होतो अशी व्यक्ती असेल व त्या कलमाचे व्यतिक्रमण करून कोणतेही अग्निशस्त्र किंवा दारूगोळा संपादन करील, आपल्या कब्जात ठेवील किंवा बरोबर बाळगील; किंवा
(e)ड)(इ) कलम ९ पोटकलम (१) खंड (ख) चे व्यतिक्रमण करून कोणत्याही अग्निशस्त्राची किंवा दारूगोळ्याची विक्री किंवा हस्तांतरण करील किंवा रूपांतर, दुरूस्ती, चाचणी करील किंवा ती वापरून दाखवील; किंवा
(f)च)(फ कलम १० चे व्यतिक्रमण करून कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा भारतात आणील किंवा तेथून बाहेर नेईल: किंवा
(g)छ (ग)) कलम १२ चे व्यतिक्रमण करून कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा यांची वाहतूक करील; किंवा
(h)ज)(ह) कलम ३ चे पोटकलम (२) किंवा कलम २१ चे पोटकलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे शस्त्रे किंवा दारूगोळा निक्षेप करण्यात कसूर करील; किंवा
(i)झ)(आय) स्वत: शस्त्रे किंवा दारूगोळा बनवणारा किंवा त्यांचा व्यापारी असून, कलम ४४ खाली केलेल्या नियमांद्वारे आवश्यक केल्याप्रमाणे अभिलेख किंवा हिशेब ठेवण्यात किंवा अशा नियमांद्वारे आवश्यक केल्याप्रमाणे त्यात अशा सर्व नोंदी करण्यात कसून करील अथवा त्यात उद्देशपूर्वक खोटी नोंद करील अतवा अशा अभिलेखाचे किंवा हिशेबाचे निरीक्षण करण्यास किंवा त्याच्या नकला काढण्यास किंवा त्यातून नोंदी घेण्यास प्रतिबंध करील किंवा अडथळा आणील अथवा जेथे शस्त्रे किंवा दारूगोळा यांची निर्मिती करण्यात येते किंवा तो ठेवण्यात येतो अशा कोणत्याही परिवास्तूमध्ये किंवा अन्य ठिकाणी प्रवेश करण्यास प्रतिबंध करील किंवा अडथळा आणील अथवा अशी शस्त्रे किंवा दारूगोळा प्रदर्शित करण्यात उद्देशपूर्वक कसूर करील किंवा ती लपवून ठेवील अथवा त्यांची निर्मिती कोठे करण्यात येते किंवा ती कोठे ठेवण्यात येतात ते निर्देशित करण्याचे नाकारील;
तो ज्याची मुदत कमीत कमी ११.(दोन वर्ष असेल, परंतु जास्तीत जास्त पाच वर्षे) असू शकेल अशा कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल आणि तसेच द्रव्यदंडासही पात्र होईल.
परंतु, न्यायालय कोणत्याही पुरेशा आणि विशेष कारणांस्तव, ती कारणे न्यायनिर्णयांत नमूद करून १२.(दोन वर्षापेक्षा) कमी मुदतीची करावासाची शिक्षा ठोठावू शकेल.)
(1C)१३.(१ ग(क)) पोटकलम १ख(ब)) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जो कोणी कोणत्याही अंशात क्षेत्रात त्या पाटकलमाखाली शिक्षायोग्य असलेला कोणताही अपराध करील, तो ज्याची मुदत कमीत कमी तीन वर्षे असेल परंतु जास्तीत जास्त सात वर्षे असू शकेल अशा कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल आणि तसेच द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
या पोटकलमचाया प्रयोजनासाठी, अशांत क्षेत्र म्हणजे, अंदाधुदीला आळा घालून सार्वजनिक सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि ती टिकवण्यसााठी उपबंध करणा?्या, त्या त्या वेळी अंमलात असणा?्या कोणत्याही अधिनियमितीअन्वये अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलेले कोणतेही क्षेत्र आणि त्यात कलम २४ क किंवा २४ ख खालील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही क्षेत्राचा समावेश होतो.)
२) स्वत: कलम ९, पोटकलम १), खंड (क), उपखंड (एक) जिला लागू होतो अशी व्यक्ती असून, जो कोणी, त्या कलमाचे व्यतिक्रमण करून कोणतेही अग्निशस्त्र किंवा दारूगोळा संपादन करील, आपल्या कब्जात ठेवील किंवा बरोबर बाळगील तो एक वर्षपर्यंत असू शकेल, एवढ्या मुदतीच्या कारावासास, किंवा द्रव्यदंडास, किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल.
१४.(३) जो कोणी, कलम ५, पोटकलम (२) च्या परंतुकातील खंड (क) किंवा खंड (ख) यांच्या उपबंधाचे व्यतिक्रमण करून, कोणत्याही अग्निशस्त्राची, दारूगोळ्याची किंवा इतर शस्त्रांची विक्री किंवा हस्तांतरण;
एक) अधिकारिता असणा?्या जिल्हा दंडाधिका?्याला किंवा सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिका?्याला, त्या अग्निशस्त्रांची, दारूगोळ्याची किंवा इतर शस्त्रांची नियोजित विक्री किंवा हस्तांतरण याबाबतची माहिती कळविल्याशिवाय; किंवा
दोन) अशा जिल्हा दंडाधिका?्याला किंवा त्या पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिका?्याला अशी माहिती दिल्याच्या तारखेपासून पंचेचाळीस दिवसांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी,
करील तो सहा महिनेपर्यंत असू शकेल एवढ्या मुदतीच्या कारावासास, किंवा पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल)
४) लायसनामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या शर्तीमध्ये बदल करण्याकरता, कलम १७, पोटकलम १) खाली लायसन प्राधिकरणाने लायसन स्वाधीन करण्याची आज्ञा केली असता तसे करण्याच्या कामी किंवा त्यांचे निलंबन किंवा प्रत्याहरण करण्यात आल्यावर, ते लायसन त्या कलमाच्या पोटकलम (१०) खाली समुचित प्राधिकरणाकडे परत करण्याच्या कामी जो कोणी कसूर करील तो, सहा महिनेपर्यंत असू शकेल, एवढ्या मुदतीच्या कारावासास, किंवा पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल, एवढ्या रकमेच्या द्रव्यदंडास, किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल.
५) कलम १९ खाली आपले नाव व पत्ता देण्याची आज्ञा करण्यात आली असता जो कोणी असे नाव व पत्ता देण्याचे नाकारील किंवा ज्याने असे नाव व पत्ता दिला असता तो खोटा असल्याचे नंतर उघडीस येईल. तो सहा महिनेपर्यंत असू शकेल. एवढ्या मुदतीच्या कारावासास किंवा दोनशे रूपयापर्यंत असू शकेल. एवढ्या रकमेच्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल.
१५.(६) जर एखाद्या संघटित गुन्हेगारी संघाचा कोणताही सदस्य किंवा तिच्या वतीने कोणताही व्यक्ती कोणत्याही वेळी प्रकरण २ च्या कोणत्याही तुरतुदींचे उल्लंघन करुन शस्त्रे किंवा दारुगोळा आपल्या कब्जात ठेवील किंवा त्याचे वहन करील तो ज्याची मुदत कमीत कमी दहा वर्ष परंतु जास्तीत जास्त आजीवन असू शकेल अशा कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
७) जो कोणी, संघटित गुन्हेगारी संघाचा सदस्याच्या वतीने किंवा कोणतीही व्यक्ती त्याच्या वतीने,-
एक) कलम ५ चे व्यतिक्रमण करून कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा यांची निर्मिती, प्राप्त करणे,खरेदी करणे, विक्री, हस्तांतरण, रूपांतरण, दुरूस्ती, चाचणी करील किंवा ती वापरून दाखवील, अथवा विक्रीसाठी मांडील अथवा विकत देण्याची किंवा हस्तांतरित करण्याची तयारी दाखविल, अथवा विक्री, हस्तांतरण, रूपांतरण, दुरूस्ती, चाचणी करण्यासाठी किंवा ती वापरून दाखविल;किंवा
दोन) कलम ६ चे व्यतिक्रमण करून अग्निशस्त्राची नळी आखूड करील किंवा नकली अग्निशस्त्राचे ख?्याखु?्या अग्निशस्त्रात रूपांतर करील किंवा शस्त्रास्त्र नियम २०१६ मध्ये नमूद केलेल्या अग्निशस्त्राच्या (बंदुक) कोणत्याही प्रवर्ग (श्रेणी) पासून इतर कोणत्याही प्रवर्गात रुपांतरीत करील; किंवा
तीन) कलम ११ चे व्यतिक्रमण करुन कोणत्याही वर्गाची (प्रकाराची) किंवा वर्णनाची शस्त्रे किंवा दारुगोळा भारतात आणिल किंवा भारताबाहेर नेईल,
तो ज्याची मुदत कमीत कमी दहा वर्ष परंतु जास्तीत जास्त आजीवन असू शकेल अशा कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
पोटकलम (६) व पोटकलम (७) च्या प्रयोजनासाठी –
(a)क)(अ) संघटित अपराध म्हणजे कोणत्याही व्यक्तीने, एकट्याने किंवा सामुहिकपणे, कोणत्याही संघटित गुन्हेगारी संघाचा सदस्य म्हणून किंवा अशा संघाच्या वतीने हिंसाचार किंवा हिंसाचाराची धमकी किंवा धमकावून किंवा जबरदस्ती करुन किंवा इतर बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करुन, स्वत: साठी किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी अवाजवी किंवा अन्य फायदा मिळविण्याच्या उद्देशाने सातत्याने विधि विरुद्ध केलेले कोणतेही कार्य अभिप्रेत आहे;
(b)ख)(ब) संघटित गुन्हेगारी संघ म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींचा असा समुह अभिप्रेत आहे, जो एखाद्या समुह किंवा टोळी म्हणून एकट्याने किंवा सामुहिकपणे सामुहिक अपराधाच्या क्रियेमध्ये सामील असतील.
८) जो कोणी, कलम ३, कलम ५, कलम ६, कलम ७ आणि कलम ११ चे उल्लंघन करुन अग्नीअस्त्र (बंदूक) आणि दारुगोळाच्या अवैध तस्करीत (व्यापारात) सामील असेल किंवा त्याला सहायता करीत असेल तर तो ज्याची मुदत कमीत कमी दहा वर्ष परंतु जास्तीत जास्त आजीवन असू शकेल अशा कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी अवैध तस्करी (व्यापार) म्हणजे भारताच्या राज्यक्षेत्रात किवा क्षेत्रामध्ये अग्निअस्त्र (बंदुक) आणि दारुगोळा आयात, निर्यात, संपादन, विक्री, वितरण, वाहतूक, किंवा हस्तांतरीत करणे अभिप्रेत आहे, जर अग्निअस्त्र (बंदुक) आणि दारुगोळा या अधिनियमाच्या तरतुदींनुसार चिन्हीत नसतील किंवा ज्यांचा या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करुन दुर्रव्यापार केला गेला आहे, याच्या अंतर्गत तस्करी (व्यापार) केले गेलेले विदेशात बनविलेले अग्निअस्त्र (बंदुक) किंवा प्रतिबंधीत शस्त्रे आणि प्रतिबंधीत दारुगोळा देखील आहे.
९) जो कोणी उतावळेपणाने किंवा निष्काळजीपणाने किंवा उत्सव गोळीबार करेल, ज्यामुळे मानवी जीवन किंवा इतर वैयक्तिक सुरक्षा धोक्यात येईल, तो दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची, किंवा एक लाखापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल किवा दोन्ही शिक्षेस पात्र होईल.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी उत्सव गाळीबार म्हणजे सार्वजनिक सभा (मेळावे), धार्मिक स्थळे, लग्नसमारंभ किवा अन्य उत्सव कार्यक्रमांमध्ये गोळीबार करण्यासाठी अग्निशस्त्र (बंदुक) चा वापर करणे (प्रथा) अभिप्रेत आहे.)
———
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ८ द्वारे मूळ पोटलकम (१) ऐवजी (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट केले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम ९ द्वारे (१४-१२-२०१९ पासून) निर्मिती ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम ९ द्वारे (१४-१२-२०१९ पासून) समाविष्ट करण्यात आले.
४. १९८८ चा अधिनियम क्रमांक ४२ याच्या कलम ५ अन्वये खंड (१-९-१९८८ पासून) वगळण्यात आला.
५. २०१९ चा अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम ९ द्वारे (१४-१२-२०१९ पासून) ज्याची मुदत कमीत कमी तीन वर्षे असेल, परंतु जास्तीत जास्त सात वर्षे असू शकेल याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. १९८८ चा अधिनियम क्रमांक ४२ याच्या कलम ५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
७. २०१९ चा अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम ९ द्वारे (१४-१२-२०१९ पासून) ज्याची मुदत कमीत कमी पाच वर्षे असेल, परंतु जी १० वर्षापर्यंत वाढविता येईल याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
८. २०१९ चा अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम ९ द्वारे (१४-१२-२०१९ पासून) सात वर्षापेक्षा याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
९. १९८८ चा अधिनियम क्रमांक ४२ याच्या कलम ५ अन्वये पोटकलम (१क) ला (१ककक) असा नवीन क्रमांक देण्यात आला आणि (१ककक) या नवीन क्रमांकाच्या पोटकलमाआधी ही पोटकलमे (१-९-१९८८ पासून) समाविष्ट करण्यात आली.
१०. १९८५ चा अधिनियम क्रमांक ३९ याच्या कलम २ द्वारे (२८-५-१९८५ पासून) एक वर्षे असेल, परंतु जास्तीत जास्त पाच वर्षे याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
११. २०१९ चा अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम ९ द्वारे (१४-१२-२०१९ पासून) एक वर्ष असेल, परंतु जास्तीत जास्त तीन वर्षे याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
१२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम ९ द्वारे (१४-१२-२०१९ पासून) एक वर्षे याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
१३. १९८५ चा अधिनियम क्रमांक ३९ याच्या कलम २ द्वारे (२८-५-१९८५ पासून) समाविष्ट करण्यात आले.
१४. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ८ अन्वये (२२-६-१९८३ पासून) पोटकलम (३) ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
१५. २०१९ चा अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम ९ द्वारे (१४-१२-२०१९ पासून) पोटकलम (५) नंतर समाविष्ट केले.

Leave a Reply