शस्त्र अधिनियम १९५९
कलम २२ :
दंडाधिकाऱ्याने झडती घेणे व सक्तीने ताब्यात घेणे :
१) जेव्हा जेव्हा कोणत्याही दंडादिकाऱ्यास, –
(a)क)(अ) त्याच्या अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही बेकायदेशीर प्रयोजनासाठी कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा आपल्या कब्जात बाळगलेला आहे, किंवा
(b)ख)(ब) अशा व्यक्तीच्या कब्जात कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा राहू दिल्यस सार्वजनिक शांततेला किंवा सुरक्षिततेला धोका पोचल्याशिवाय राहणार नाही, असे समजण्यास कारण असेल तेव्हा, आपल्या या समजामागील कारणे नमूद करून, दंडाधिकाऱ्याला अशा व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या अथवा जेथे शस्त्रे किंवा दारूगोळा सापडण्यासारखा आहे असे समजण्यास या दंडाधिकाऱ्याला कारण असेल त्या घराची किंवा वास्तूची झडती करता येईल आणि अशी कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा असल्यास, जरी हा अधिनियम किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणताही कायदा यांच्या आधारे ती व्यक्ती ती कब्जात ठेवण्यास हक्कदार असली तरी, ती सक्तीने ताब्यात घेऊन स्वत:ला योग्य वाटेल इतक्या कालावधीकरता आपल्या ताब्यात सुरक्षितपणे अडकवून ठेवता येतील.
२) या कलमाखालील प्रत्येक झडती, दंडाधिकाऱ्याकडून किंवा त्याच्या समक्ष किंवा केंद्र शासनाने याबाबतीत विशेषकरून शक्ती प्रदान केलेल्या एखाद्या अ्रधिकाऱ्याकडून किंवा त्याच्या समक्ष करण्यात येईल.