Arms act कलम १९ : लायसन, इत्यादी हजर करण्याची मागणी करण्याची शक्ती :

शस्त्र अधिनियम १९५९
प्रकरण ४ :
शक्ति व प्रक्रिया :
कलम १९ :
लायसन, इत्यादी हजर करण्याची मागणी करण्याची शक्ती :
१) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास किंवा केंद्र शासनाने याबाबतीत विशेषकरून शक्ती प्रदान केलेल्या अन्य कोणत्याही अधिकाऱ्यास, कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा बरोबर बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने आपले लायसन हजर करावे अशी मागणी करता येईल.
२) जिच्याकडे मागणी करण्यात आली असेल अशा व्यक्तीने लायसन हजर करण्याचे किंवा अशी शस्त्रे किंवा दारूगोळा लायसनाशिवाय बरोबर बाळगण्यास या अधिनियमाच्या किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याच्या आधारे आपण हक्कदार आहोत हे दाखवून देण्याचे नाकारले किंवा त्या कामी कसूर केली तर, संबंधित अधिकारी, त्यास आपले नाव व पत्ता देण्याची आज्ञा करू शकेल आणि जर अशा अधिकाऱ्यास आवश्यक वाटले तर, अशा व्यक्तीने बरोबर बाळगलेली शस्त्रे किंवा दारूगोळा तिच्याकडऊन सक्तीने ताब्यात घेऊ शकेल.
३) जर त्या व्यक्तीने आपले नाव व पत्ता देण्यास नकार दिला अथवा ती व्यक्ती खोटे नाव किंवा खोटा पत्ता देत असावी किंवा फरारी होण्याचा तिचा उद्देश असावा असा संबंधित अधिकाऱ्यास संशय आला तर, असा अधिकारी तिला अधिपत्राविना अटक करू शकेल.

Leave a Reply