शस्त्र अधिनियम १९५९
कलम १७ :
लायसनामध्ये बदल, त्यांचे निलंबन व प्रत्याहरण :
१) ज्यांच्या अधीनतेने लायसन मंजूर करण्यात आले असेल अशांपैकी विहित असतील अशा शर्तीखेरीज अन्य शर्ती लायसन प्राधिकरणास बदलता येतील आणि त्या प्रयोजनाकरिता ते लेखी नोटिशीद्वारे लायसनधारकास त्या नोटिशीत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा मुदतीत लायसन आपल्या स्वाधीन करण्याची आज्ञा करू शकेल.
२) लायसनधारकाच्या अर्जावरून देखील लायसन प्राधिकरणास लायसनच्या शर्तीपैकी विहित असतील अशा शर्तीखेरीज अन्य शर्तीमध्ये बदल करता येईल.
३) (a)क)(अ) कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा संपादन करण्यास तो आपल्या कब्जात ठेवण्यास किंवा बरोबर बाळगण्यास लायसनधारकाला या अधिनियमाद्वारे किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या फायद्याद्वारे मनाई करण्यात आलेली आहे किंवा तो विकल मनाचा आहे किंवा या अधिनियमानुसार लायसन धारण करण्यास कोणत्याही कारणांमुळे अपात्र आहे अशी लायसन प्राधिकरणाची खात्री झाली तर; किंवा
(b)ख)(ब) सार्वजनिक शांतता राखण्याच्या किंवा सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने लायसन निलंबित करणे किंवा प्रत्याहृत करणे आवश्यक आहे असे लायसन प्राधिकरणास वाटले तर; किंवा
(c)ग) (क) लायसनासाठी अर्ज करण्याच्या वेळी लायसनधारकाने किंवा त्याच्या वतीने अन्य कोणत्याही व्यक्तीने महत्त्वाची माहिती दडपून टाकून किंवा त्यांनी पुरविलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे मिळवलेली असल्यास; किंवा
(d)घ) (ड)लायसनाच्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे व्यतिक्रमण करण्यात आले असल्यास किंवा;
(e)ङ)(इ) लायसन स्वाधीन करण्याबाबत लायसनधारकाला आज्ञापिणाऱ्या पोटकलम (१) खालील नोटिशीचे अनुपालन करण्यात त्याने कसूर केली असेल तर,
लायसन प्राधिकरणाला लेखी आदेशाद्वारे ते लायसन त्याला योग्य वाटेल अशा कालावधीपुरते निलंबित करता येईल किंवा ते प्रत्याहृत करता येईल.
४) लायसन प्राधिकरणास लायसनधारकाच्या अर्जावरून देखील लायसन प्रत्याहृत करता येईल.
५) जेव्हा लायसन प्राधिकरण पोटकलम (१) खाली लायसनामध्ये बदल करणारा किंवा पोटकलम (३) खाली लायसन निलंबित किंवा प्रत्याहृत करणारा आदेश देईल तेव्हा, ते त्याबद्दलचे कारण लेखी नमूद करील आणि लायसनधारकाला त्याचे संक्षिप्त निवेदन पुरवणे लोकहिताचे ठरणार नाही असे ज्याबाबतीत त्याचे मत असेल अशी एखादी बाब सोडून एरव्ही ते, मागणी झाल्यास त्याला असे निवेदन पुरवील.
६) लायसन प्राधिकरण ज्यास दुय्यम असे प्राधिकरण, लायसन प्राधिकरणास ज्या कारणावरून लायसन निलंबित किंवा प्रत्याहृत करता येईल अशा कोणत्याही कारणावरून लेखी आदेशाद्वारे लायसन निलंबित किंवा प्रत्याहृत करू शकेल; आणि या कलमाचे पूर्ववर्ती उपबंध, होईल तेथवर, अशा लायसन प्राधिकरणाकडून होणारे लायसनचे निलंबन किंवा प्रत्याहरण यासंबंधात लागू होतील.
७) या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या अधीनतेने, कोणत्याही अपराधाबद्दल लायसनधारकास दोषी ठरवणारे कोणतेही न्यायालय लायसन निलंबित किंवा प्रत्याहृतही करू शकेल :
परंतु, अपिलान्ती किंवा अन्यथा दोषसिद्धी रद्द ठरवण्यात आली तर, निलंबन किंवा प्रत्याहरण शून्य होईल.
८) पोटकलम (७) खालील निलंबाच्या किंवा प्रत्याहरणाचा आदेश अपील न्यायालयास किंवा पुनरीक्षण करण्याच्या आपल्या शक्तीचा वापर करताना उच्च न्यायालयासही काढता येईल.
९) केंद्रशासन, शासकीय राजपत्रातील आदेशाद्वारे या अधिनियमानुसार मंजूर करण्यात आलेली सर्व किंवा त्यापैकी कोणतीही लायसने संपूर्ण भारतभर किंवा त्याच्या कोणत्याही भागापुरती निलंबित किंवा प्रत्याहृत करू शकेल किंवा निलंबित किावा प्रत्याहृत करण्याविषयी लायसन प्राधिकरणास निदेश देऊ शकेल.
१०) या कलमाकाली लायसनाचे निलंबन किंवा प्रत्याहरण झाल्यावर, त्याचा धारक विनाविलंब असे लायसन, ज्याने ते निलंबित किंवा प्रत्याहृत केले त्या प्राधिकरणाच्या किंवा निलंबनाच्या किंवा प्रत्याहणाच्या आदेशात यासंबंधी विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा अन्य प्राधिकरणाच्या स्वाधीन करील.