शस्त्र अधिनियम १९५९
कलम १५ :
लायसनचा कालावधी नूतनीकरण :
१) कलम ३ खालील लायसन ते मंजूर करण्यात आल्याच्या दिनांकापासून १.(पाच वर्षे इतका काळ), – तत्पूर्वी ते प्रत्याहत करण्यात आले नाही तर- अंमलात असण्याचे चालू राहील :
परंतु ज्या व्यक्तीने लायसन मागितले असेल अशा व्यक्तीची तशी इच्छा असेल किंवा लायसन प्राधिकरणास एखाद्या बाबतीत लायसन त्याहून अल्प मुदतीपुरते मंजूर करावे असे वाटत असल्यास कारणे लेखी नमूद करून असे लायसन त्या अल्प मुदतीपुरते मंजूर करता येईल :
२.(परंतु यह और कि धारा ३ के अधीन अनुदत्त अनुज्ञप्ति, धारा ९ की उपधारा (१) के खंड (क) के उपखंड (दो) और उपखंड (तीन) में विनिर्दिष्ट शर्तो के अध्यधीन होगी और अनुज्ञप्तिधारी, अनुज्ञप्ति को उस तारीख से, जिसको यह अनुदत्त या नवीकृत की जाए, प्रत्येक पांच वर्ष के पश्चात्, अनुज्ञापन प्राधिकारी के समक्ष अग्नायुध या गोला बारुद और संबंधित दस्तावेज सहित पेश करेगा ।)
२) दुसऱ्या प्रकरणाच्या अन्य कोणत्याही उपबंधाखालील लायसन ज्या दिनांकास ते मंजूर करण्यात आले त्या दिनांकापासून लायसन प्राधिकरण प्रत्येक बाबतीत ठरवील अशा कालावधीपूरते, … तत्पूर्वी ते प्रत्याहृत करण्यात आले नाही, – अंमलात असल्याचे चालू राहील.
३) प्रत्येक लायसन मुळात ते जेवढ्या कालावधीकरता मंजूर करण्यात आले होते, तेवढ्याच कालावधीपूरते नूतनीकरण योग्य असेल आणि वेळोवेळी अशाप्रकारे त्याचे नूतनीकरण करता येर्सल आणि कलमे १३ व १४ यांचे उपबंध लायसनच्या मंजुरीस ज्याप्रमाणे लागू होतात त्याचप्रमाणे ते त्याच्या नूतनीकरणास लागू होतील, मात्र एखाद्या बाबतीत लायसन प्राधिकरणाने अन्यथा ठरवले तर त्याला कारणे नमूद करावी लागतील.——–
———-
१. २०१९ चा ४८ कलम ६ द्वारा (१४-१२-२०१९ पासून) (तीन वर्षे इतका काळ) शब्दा ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा ४८ कलम ६ द्वारा (१४-१२-२०१९ पासून) परंतुक समाविष्ट करण्यात आले.