Arms act कलम १३ : लायसन मंजूर करणे :

शस्त्र अधिनियम १९५९
प्रकरण ३ :
लायसनांसंबंधीचे उपबंध (तरतुदी) :
कलम १३ :
लायसन मंजूर करणे :
१) दुसऱ्या प्रकरणाखाली लायसन मंजूर होण्यासाठी करावयाचा अर्ज लायसन प्राधिकरणाकडे करावा लागेल आणि तो विहित करण्यात येईल अशा नमुन्यात असेल व त्यात तसा विहित तपशील असेल व कोणतही फी विहित करण्यात आलेली असल्यास ती त्या सोबत भरावी लागेल.
१.(२) अर्ज मिळाल्यावर लायसन प्राधिकरण, सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याचा त्या अर्जावरील अभिप्राय मागवील; आणि असा अधिकारी विहित अवधीत आपला अभिप्राय पाठवील.
(2-A)२क)(२अ) लायसन प्राधिकरण, त्याला कोणतीही चौकशी करणे आवश्यक वाटल्यास अशी चौकशी केल्यानंतर आणि पोटकलम (२) खालील अभिप्राय मिळाल्यानंतर, या प्रकरणाच्या इतर उपबंधांच्या अधीनतेने लेखी आदेशाद्वारे एकतर लायसन देईल किंवा ते देण्यास नकार देईल;
परंतु, सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याने अर्जावरील आपला अभिप्राय विहित अवधीत न पाठवल्यास अशा बाबतीत लायसन प्राधिकरण त्याला तसे योग्य वाटले तर, विहित अवधी समाप्त झाल्यानंतर त्या अभिप्रायाची आणखी वाट न पाहता असा आदेश काढू शकेल.)
३) लायसन प्राधिकरण पुढीलप्रमाणे लायसन मंजूर करील:
(a)क) (अ) कलम ३ खालील लायसन,-
एक) संरक्षण किंवा खेळ याकरिता वापरावयाची २० इंचांपेक्षा कमी नाही इतक्या लांबीची नळी व बिनआट््याची पोकळी असलेल्या बंदुकिबाबत किंवा खरोखरी पीक संरक्षणासाठी वापरावयाच्या तोंडाकडून ठासलेल्या बंदुकीबाबत, भारताच्या एखाद्या नागरिकाने मागितल्यास ते दिले जाईल:
परंतु एखाद्या प्रकरणातील परिस्थिती लक्षात घेता, तोंडाकडून ठासावयाची बंदूक पीक संरक्षणासाठी पुरेशी नाही अशी लायसन प्राधिकरणाची खात्री झाली तर, लायसन प्राधिकरण अशा संरक्षणासाठी उपरोक्तप्रमाणे बिनआट्याची पोकळी असलेल्या अन्य कोणत्याही बंदुकीच्या संबंधात लायसन देऊ शकेल, किंवा
दोन) केंद्र शासनाने लायसन दिलेल्या किंवा मान्यता दिलेल्या रायफल क्लबच्या किंवा रायफल संघाच्या सदस्याने नेमबाजीच्या सरावासाठी वापरावयाच्या २.(अग्निशस्त्र) बाबत मागितले गेल्यास ते दिले जाईल.
(b)ख) (ब) कलम ३ खालील लायसन अन्य कोणत्याही बाबतीत किंवा कलम ४, कलम ५, कलम ६, कलम १० किंवा कलम १२ खालील लायसन ज्या व्यक्तीने मागितले असेल तिला ते मिळण्यास सबळ कारण आहे याविषयी लायसन प्राधिकरणाची खात्री पटली तर, ते दिले जाईल.
———-
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ६ द्वारा (२२-६-१९८३ पासून) पोटकलम (२) ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा ४८ कलम ६ द्वारा (१४-१२-२०१९ पासून) (पाँईट २२ बोअर रायफलीबाबत किंवा हवाई रायफली) शब्दा ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply