Constitution अनुच्छेद ४९ : राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ४९ :
राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण :
१.(संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित केलेले) कलादृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहलविषय असलेले प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे यथास्थिति, लूट, विद्रूपण, नाश, स्थलांतरण, विल्हेवाट किंवा निर्यात यांपासून संरक्षण करणे, ही राज्याची जबाबदारी असेल.
—————-
१.संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २७ द्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केले.

Leave a Reply