Constitution अनुच्छेद २३ : माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
शोषणाविरूद्ध हक्क :
अनुच्छेद २३ :
माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई :
(१) माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे आणि या तरतुदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.
(२) या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, सार्वजनिक प्रयोजनाकरता सक्तीने सेवा करायला लावण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही व अशी सेवा करावयास लावताना केवळ धर्म, वंश, जात वा वर्ग या अथवा यांपैकी कोणत्याही कारणावरून राज्य, कोणताही भेदभाव करणार नाही.

Leave a Reply