भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ४ :
पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद २ व ३ अन्वये करण्यात आलेले कायदे :
(१) अनुच्छेद २ किंवा अनुच्छेद ३ मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही कायद्यात, त्या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक अशा, पहिली अनुसूची व चौथी अनुसूची यात सुधारणा करण्याविषयीच्या तरतुदी अंतर्भूत असतील आणि संसदेला आवश्यक वाटतील अशाही पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप तरतुदी (अशा कायद्याचा परिणाम होणाऱ्या राज्याच्या किंवा राज्यांच्या संसदेतील व विधानमंडळातील किंवा विधानमंडळांमधील प्रतिनिधित्वासंबंधीच्या तरतुदींसह) अंतर्भूत असू शकतील.
(२) अनुच्छेद ३६८ च्या प्रयोजनांकरिता पूर्वोक्त असा कोणताही कायदा या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही.