भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १५४ :
असभ्य व अपवादात्मक प्रश्न :
जे कोणतेही प्रश्न किंवा ज्या चौकशी न्यायालयाला असभ्य किंवा अपप्रवादात्मक वाटतात त्यांचा न्यायालयासमोर असलेल्या प्रश्नांशी संबंध असला तरी, ते प्रश्न किंवा त्या चौकशा वादनिविष्ट तथ्यांशी किंवा वादनिविष्ट तथ्ये अस्तित्वात होती की नव्हती हे ठरवण्यासाठी ज्या बाबी माहीत असणे जरूरीचे आहे त्यांच्याशी संबंधित नसतील तर, न्यायालय त्यांना मनाई करू शकेल.