Bsa कलम १४६ : उत्तरसूचक प्रश्न :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १४६ :
उत्तरसूचक प्रश्न :
१) प्रश्नकर्त्या व्यक्तीने इच्छिलेले किंवा अपेक्षिलेले उत्तर सूचित करणाऱ्या प्रश्नाला उत्तरसूचक प्रश्न असे म्हटले जाते.
२) उत्तरसूचक प्रश्नांना विरूद्ध पक्षकाराने आक्षेप घेतल्यास तसे प्रश्न सरतपासणीत किंवा फेरतपासणीत न्यायालयाच्या परवानगीखफेरीज विचारता कामा नयेत.
३) ज्या बाबी प्रस्तावनात्मक किंवा निर्विवाद आहेत अथवा न्यायालयांच्या मते ज्या आधीच पुरेशा शाबीत झालेल्या आहेत त्यांच्यासंबंधीच्या उत्तरसूचक प्रश्नांना न्यायालय परवानगी देईल.
४) उत्तरसूचक प्रश्न उलटतपासणीत विचारता येतील.

Leave a Reply