भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १३४ :
विधी सल्लागारांकडे केलेली गोपनीय निवेदने :
एखादी व्यक्ती आणि तिचा विधि सल्लागार यांच्यामध्ये झालेले कोणतेही निवेदन, तिने साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याशिवाय, न्यायालयाकडे प्रकट करण्याची तिच्यावर सक्ती केली जाणार नाही व तिने तसे केल्यास त्या बाबतीत, तिने दिलेल्या कोणत्याही पुराव्याच्या खुलासा होण्यासाठी न्यायालयाला आवश्यक वाटेल असे कोणतेही निवेदन प्रकट कण्याची तिच्यावर सक्ती करता येईल, पण इतर निवेदनांबाबत सक्ती करता येणार नाही.
