Bsa कलम १२७ : न्यायाधीश व दंडाधिकारी यांची साक्ष :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १२७ :
न्यायाधीश व दंडाधिकारी यांची साक्ष :
कोणताही न्यायाधीश किंवा दंडाधिकारी यांच्यावर, तो ज्याला दुय्यम असेल अशा एखाद्या न्यायालयालच्या विशेष आदेशाखेरीज असा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून न्यायालयातील त्याच्या स्वत:च्या वर्तनाच्या अथवा असा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून न्यायालयात त्याला ज्ञात झालेल्या कोणत्याही गोष्टीच्या संबंधात कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याची सक्ती केली जाणार नाही; पण तो ते काम करीत असताना त्याच्या समक्ष घडलेल्या अन्य गोष्टीबाबत त्याची साक्षतपासणी करता येईल.
उदाहरणे :
(a) क) सत्र न्यायालयापुढे स्वत:ची संपरीक्षा झाल्यावर (ऐ) म्हणतो की, (बी) या दंडाधिकाऱ्याने माझी जबानी अयोग्यपणे घेतली होती. वरिष्ठ न्यायालयाच्या विशेष आदेशाखेरीज, याबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची (बी) वर सक्ती करता येत नाही.
(b) ख) (बी) या दंडाधिकाऱ्यापुढे खोटा पुरावा दिल्याबद्दल (ऐ) वर सत्र न्यायालयात आरोप ठेवण्यात आला आहे. (ऐ) ने काय म्हटले हे (बी) ला वरिष्ठ न्यायालयाच्या विशेष आदेशाखेरीज विचारात येत नाही.
(c) ग) (बी) या सत्र न्यायाधीशासमोर (ऐ) ची संपरीक्षा चालू असताना एका पोलीस आधिकाऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल (ऐ) वर सत्र न्यायालयात आरोप ठेवण्यात आला आहे. काय घडले याबद्दल (बी) ची साक्षतपासणी करता येईल.

Leave a Reply