Bsa कलम १२१ : प्रतिष्ठंभ-प्रतिबंध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
प्रकरण ८ :
प्रतिष्ठंभ (प्रतिबंध) :
कलम १२१ :
प्रतिष्ठंभ-प्रतिबंध :
जेव्हा एखाद्या व्यक्तीने स्वत:चे अधिकथन, कृती किंवा अकृती याद्वारे एखादी गोष्ट खरी आहे असा दुसऱ्या व्यक्तीचा समज व्हावा व तिने तशा समजुतीने वागावे असे उद्देशपूर्वक योजून आणले असेल किंवा तिला तसे वागू दिले असेल तेव्हा, पहिल्या व्यक्तीला किंवा तिच्या प्रतिनिधीला ती पहिली व्यक्ती स्वत: व अशी दुसरी व्यक्ती किंवा तिचा प्रतिनिधी यांच्या दरम्यानच्या कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत त्या गोष्टीची सत्यता नाकबूल करू दिली जाणार नाही.
उदाहरण :
विवक्षित जमीन (ऐ) ची आहे अशी (ऐ) उद्देशपूर्वक व खोटेपणाने (बी) ची समजूत होऊ देतो व त्याद्वारे, ती विकत घेऊन तिची किंमत देण्यास (बी) ला प्रवृत्त करतो. नंतर ती जमीन (ऐ) ची मालमत्ता होते व आपणांस विक्रीच्या वेळी कोणत्याही स्वत्वाधिकार नव्हता या कारणावरुन तो विक्री रद्द करु पाहतो. त्याला स्वत:चा स्वत्वाधिकार नव्हता असे शाबीत करु देता कामा नये.

Leave a Reply