भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ११८ :
हुंडाबळी संदर्भात अनुमान (गृहीतक) :
जेव्हा असा प्रश्न असतो की एखाद्या व्यक्तीने स्त्रीचा हुंडाबळी घेतला आहे काय तर अशा वेळी असे दाखविण्यात आले की त्या स्त्रीचा मृत्यू होण्यापूर्वी नजीकच्या काळातच त्या व्यक्तीकडून तिला क्रूरपणे वागविले जात होते. तिची छळवणूक होत होती. आणि त्यामागे हुंड्याची मागणी पूर्ण करावी असा इरादा (अपेक्षा) होता, तर न्यायालय असे गृहीत धरील की अशा व्यक्तीनेच सदरचा हुंडाबळी घेतला आहे.
स्पष्टीकरण :
या कलमाकरिता हुंडाबळी याचा अर्थ भारतीय न्याय संहिता २०२३ याचे कलम ८० प्रमाणेच घ्यावयाचा आहे.