भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
प्रकरण ६ :
लेखी पुराव्यामुळे तोंडी पुरावा अपवर्जित होणे या विषयी :
कलम ९४ :
मालमत्तेचे कंत्राट, देणगी किंवा अन्य प्रकारची विल्हेवाट त्याच्या संदर्भात अटी लेखी स्वरूपात असतील तर पुरावा :
जेव्हा संविदेच्या किंवा देणगीचया किंवा अन्य कोणत्याही संपत्तिव्यवस्थेच्या अटी दस्तऐवजाच्या रूपात लेखनिविष्ट केलेल्या असलतील तेव्हा व ज्यांमध्ये कोणतीही बाब दस्तऐवजाच्या रूपात लेखनिविष्ट करणे कायद्याने आवश्यक असेल अशा सर्व प्रकरणी, अशा संविदेच्या, देणगीच्या किंवा संपत्तिव्यवस्थेच्या शाबितीसाठी खुद्द तो दस्तऐवज किंवा यात यापूर्वी अंतर्भूत असलेल्या उपबंधाखाली ज्यात दुय्यम पुरावा स्वीकार्य असेल त्या प्रकरणी त्या दस्तऐवजाच्या मजकुराचा दुय्यम पुरावा यांखेरीज कोणताही पुरावा देता येणार नाही.
अपवाद १ :
जेव्हा एखादा लोक अधिकारी लेखान्वये नियुक्त करणे कायद्यानुसार आवश्यक असेल व एखाद्या विशिष्ट व्यक्तीने असा अधिकारी म्हणून कार्य केले आहे असे दाखवून देण्यात आले असेल तेव्हा, ज्या लेखान्वये त्याला नियुक्त केले गेले तो लेख शाबीत करण्याची जरूरी नाही.
अपवाद २ :
भारतात संप्रमाणर्थ स्वीकृत केलीली मृत्युपत्रे संप्रमाणराने शाबीत करता येतील.
स्पष्टीकरण १ :
उपरिनिर्दिष्ट संविदा, देणग्या किंव संपत्तिव्यवस्था एका दस्तऐवजात अंतर्भूत असताता तेव्हा त्या प्रकरणांना व त्या एकाहून अधिक दस्तऐवजांमध्ये अंतर्भूत असतात तेव्हा त्या प्रकरणांना हे कलम सारखेच लागू होते.
स्पष्टीकरण २ :
एकाहून अधिक मूळ लेख असतील तेव्हा, फक्त एकच मूळ लेख शाबीत करण्याची जरूरी असते.
स्पष्टीकरण ३ :
या कलमात निर्दिष्ट केलेल्या तथ्यांहून अन्य तथ्याचे कोणत्याही दस्तऐवजात -मग तो कसलाही असो -कथन केलेले असल्यास, त्या तथ्यांसंबंधी तोंडी पुरावा स्वीकृत करण्यास प्रतिबंध होणार नाही.
उदाहरणे :
(a) क) जर संविदा अनेक पत्रांमध्ये अंतर्भूत असेल तर, ज्यांमध्ये ती अंतर्भूत आहे ती सर्व पत्रे शाबीत केली पाहिजेत.
(b) ख) जर संविदा एखाद्या विनिमयपत्रात अंतर्भूत असेल तर, विविमयपत्र शाबीत केले पाहिजे.
(c) ग) जर विनिमयपत्र तीन विपत्रांच्या संचात काढलेले असेल तर, फक्त एकच शाबीत करणे जरुर आहे.
(d) घ) (ऐ) हा (बी) शी विवक्षित अटींवर नीळ देण्याची लेखी संविदा करतोे. .ज्याबद्दल अन्य एखाद्या प्रसंगी तोंडी संविदा झाली होती अशा दुसऱ्या निळीची किंमत (ऐ) ने (बी) ला चुकती केली होती हे तथ्य त्या लेखी संविदेत उल्लेखिलेले आहे. त्या दुसऱ्या निळीबद्दल पैसे देण्यात आले नव्हते असा तोंडी पुरावा देऊ करण्यात येतो हा पुरावा स्वीकार्य आहे.
(e) ङ) (बी) ने दिलेल्या पैशांबद्दल क हा ख ला पावती देतो. पैसे देण्यात आल्याचा तोंडी पुरावा देऊ करण्यात येतो. हा पुरावा स्वीकार्य आहे.