Bsa कलम ७५ : सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ७५ :
सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती :
ज्याचे निरीक्षण करण्याचा कोणत्याही व्यक्तीला हक्क आहे, असा सार्वजनिक दस्तऐवज ज्याच्या ताब्यात असेल असा प्रत्येक लोक अधिकारी, एखाद्या व्यक्तीने मागणी केली असता त्या व्यक्तीला, तिने त्यासाठी द्यावयाची कायदेशीर फी दिल्यावर अशा दस्तऐवजाची एक प्रत देईल व तसेच त्या प्रतीच्या तळाशी, अशा दस्तऐवजाची किंवा, प्रकरणपरत्वे, त्याच्या भागाची ती खरी प्रत आहे असे प्रमाणपत्र लिहून देईल व अशा प्रमाणपत्रावर असा अधिकारी दिनांक घालून आपल्या नावानिशी व आपल्या पदनामानिशी स्वाक्षरी करील आणि जेव्हा जेव्हा असा अधिकारी मोहोरेचा वापर करण्यास कायद्याने प्राधिकृत असेल तेव्हा, तो दस्तऐवज तो मुद्रांकित करील; व अशा प्रमाणित केलेल्या प्रतींना प्रमाणित प्रती असे म्हटले जाईल.
स्पष्टीकरण :
आपल्या पदीय कामाच्या सर्वसामान्य क्रमानुसार ज्या कोणत्याही अधिकाऱ्याला अशा प्रती देण्याचा अधिकार असेल त्याच्याकडे अशा दस्तेऐवजाचा ताबा असल्याचे या कलमाच्या अर्थानुसार मानले जाईल.

Leave a Reply