भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ३६ :
कलम ३५ मध्ये उल्लेखिलेल्यांहून अन्य न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामे यांची संबद्धता व परिणाम :
कलम ३५ मध्ये उल्लेखिलेल्यांहून अन्य असे न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामे चौकशीशी संबद्ध असलेल्या सार्वजनिक बाबींशी संबंधित असतील तर, ते संबद्ध असतात, पण असे न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामे त्यात जे नमूद केलेले असेल त्याचा निर्णायक पुरावा नसतात.
उदाहरण :
आपल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याबद्दल (ऐ) हा (बी) विरुद्ध दावा लावतो. (बी) त्या जमिनीवर सार्वजनिक मार्गाधिकार अस्तित्वात असल्याचे अभिकथन करतो व (ऐ) ते नाकबूल करतो. त्याच जमिनीवर अतिक्रमण केल्याबद्दल (ऐ) ने (सी) विरुद्ध लावलेल्या ज्या दाव्यात (सी) ने तसाच मार्गाधिकार अस्तित्वात असल्याचे अभिकथन केले होते त्या दाव्यात प्रतिवादीच्या बाजूने झालेल्या हुकूमनाम्याचे अस्तित्व संबद्ध आहे, पण मार्गाधिकार अस्तित्वात असल्याचा तो निर्णायक पुरावा नाही.