Bsa कलम २४ : एका आरोपीचा कबुलीजबाब त्याच अपराधातील इतर आरोपीविरूद्ध विचारात घेणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम २४ :
एका आरोपीचा कबुलीजबाब त्याच अपराधातील इतर आरोपीविरूद्ध विचारात घेणे :
जेव्हा एकाहून अनेक व्यक्तींची एकाच अपराधाबद्दल संयुक्तपणे संपरीक्षा केली जात असेल व अशा व्यक्तींपैकी एका व्यक्तीने दिलेला आणि तिला स्वत:ला व अशांपैकी दुसऱ्या कोणाला बाधक असलेला असा कबुलीजबाब शाबीत झाला असेल तेव्हा, न्यायालयाला असा कबुलीजबाब अशा अन्य व्यक्तीविरूद्ध व त्याचप्रमाणे असा कबुलीजबाब देणाऱ्या व्यक्तीविरूद्ध विचारात घेता येईल.
स्पष्टीकरण १ :
या कलमात अपराध हा शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्याच अर्थाने त्यात २.(अपराधाचे) अपप्रेरण किंवा अपराध करण्याचा प्रयत्न यांचा समावेश आहे.
स्पष्टीकरण २ :
फरारी असलेल्या आरोपीच्या अनुपस्थितीत किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ याच्या कलम ८२ अन्वये काढलेल्या उद्घोषणेचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या आरोपीच्या, कोणत्याही खटल्याला (प्रकरणाला) या कलमाच्या प्रयोजनासाठी संयुक्त संपरीक्षा मानण्यात येईल.
उदाहरणे :
(a) क) (सी) च्या खुनाबद्दल (ऐ) व (बी) यांची संयुक्तपणे संपरीक्षा हाते. (सी) चा खून (बी) ने व मी केला असे (ऐ) म्हणाल्याचे शाबीत होते. न्यायालयाला या कबुलीजबाबाचा परिणाम (बी) विरुद्ध विचारात घेता येईल.
(b) ख) (सी) च्या खुनाबद्दल क ची संपरीक्षा चालू आहे. (ऐ) व (बी) यांनी (सी) चा खुन केला व (सी) चा खून (ऐ) ने व मी केला असे (बी) म्हणाला असा पुरावा आहे. न्यायालयाला हे कथन (ऐ) विरुद्ध विचारात घेता येणार नाही, कारण (बी) ची त्याच्याबरोबर संयुक्तपणे संपरीक्षा चालू नाही.

Leave a Reply