भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १९ :
कबुली देणाऱ्या व्यक्तीविरूद्ध आणि त्याच्याकडून किंवा त्याच्यार्ते कबुल्यांची शाबिती :
कबुल्या देणारी व्यक्ती किंवा तिचा हितसंबंद -प्रतिनिधी यांच्याविरूद्ध त्या कबुल्या संबद्ध असतात आणि त्यांच्याविरूद्ध त्या शाबीत करता येतात; पण कबुली देणाऱ्या व्यक्तीला किंवा तिच्या वतीने किंवा तिच्या हितसंबंध-प्रतिनिधीला पुढील बाबी खेरीजकरून एरव्ही त्या शाबीत करता येत नाहीत, अर्थात :-
१) कबुली देणारी व्यक्ती मृत असती तर जी कबुली कलम २६ च्या खाली त्रयस्थ व्यक्तीच्या दरम्यान संबद्ध झाली असती अशा स्वरूपाची असेल तेव्हा, ती कबुली देणाऱ्या व्यक्तीद्वारे किंवा तिच्या वतीने ती शाबीत करता येईल.
२) एखादी कबुली म्हणजे संबद्ध किंवा वादनिविष्ट असलेल्या कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक अवस्थेच्या अस्तित्वाबाबत अशी मानसिक किंवा शारीरिक अवस्था अस्तित्वात असण्याच्या वेळी किंवा त्या सुमारास केलेले कथन असेल आणि त्याचा खोटेपणा असंभाव्या करणारे वर्तन त्या कथनाच्या बरोबर घडलेले असेल तेव्हा, कबुली देणाऱ्या व्यक्तीला किंवा तिच्या वतीने ती शाबीत करता येईल.
३) एखादी कबुली ही, कबुली म्हणून संबद्ध नसून अन्यथा संबद्ध असेल तर, कबुली देणाऱ्या व्यक्तीला किंवा तिच्या वतीने ती शाबीत करता येईल.
उदाहरणे :
(a) क) विवक्षित विलेख बनावट आहे की नाही हा (ऐ) व (बी) यांच्यामधील प्रश्न आहे. तो खरा आहे असे (ऐ) म्हणतो, तर तो बनावट आहे असे (बी) चे म्हणणे आहे. विलेख खरा आहे असे (बी) ने कथन केल्याचे (ऐ) ला शाबीत करता येईल व विलेख खोटा आहे असे (ऐ) ने कथन केल्याचे (बी) ला शाबीत करता येईल; पण विलेख खरा आहे असे स्वत: कथन केल्याचे (ऐ) ला शाबीत करता येणार नाही, आणि विलेख बानवट आहे असे स्वत: कथन केल्याचे ख ला शाबीत करता येणार नाही.
(b) ख) जहाजाचा कप्तान (ऐ) याने जहाज टाकून दिल्याबद्दल त्याची संपरीक्षा केली जाते. जहाज त्याच्या योग्य मार्गाबाहेरुन नेण्यात आले होते हे दर्शविणारा पुरावा दिला गेला आहे. (ऐ) आपल्या कामाच्या सामान्य क्रमानुसार आपण ठेवलेली चोपडी हजर करतो ; जी अवलोकने त्याने रोजच्या रोज टिपून ठेवली असल्याचे अभिकथन करण्यात आले आहे ती त्यात दर्शवलेली असून, जहाज त्याच्या योग्य मार्गाबाहेरुन नेण्यात आले नसल्याचे त्यावरुन सूचित झाले आहे. (ऐ) ला ही कथने शाबीत करता येतील, कारण तो मृत्यु पावला असात तर २६ व्या कलमाच्या खंड (ख) खाली ही कथने त्रयस्थ पक्षांच्या दरम्यान ग्राह्य झाली असती.
(c) ग) (ऐ) ने कलकत्ता येथे गुन्हा केल्याचा त्याच्यावर आरोेप आहे. जे पत्र लाहोर येथे त्याने स्वत: लिहून त्यावर त्या दिवशी दिनांक टाकला होता व त्यावर लाहोर डाकेचा त्या दिवसाचा शिक्का आहे असे एक पत्र तो हजर करतो. पत्राच्या दिनांकाच्या रुपातील कथन ग्राह्य आहे, कारण (ऐ) मृत्यु पावला असता तर २६ व्या कलमाच्या खंड (ख) खाली ते ग्राह्य झाले असते.
(d) घ) एखादा माल हा चोरीचा माल आहे हे माहीत असताना तो स्वीकारल्याचा (ऐ) वर आरोेप आहे. चोरीचा माल त्याच्या किंमतीहून कमी किंमतीला विकण्यास आपण नकार दिला होता हे शाबीत करण्याची तो तयारी दाखवतो. ही कथने म्हणजे कबुल्या असल्या तरी (ऐ) ला ती शाबीत करता येतील, कारण ती वादतथ्यांचा परिणाम दर्शवणाऱ्या वर्तनाचा खुलासा करणारी आहेत.
(e) ड) जे चलन नकली असल्याचे (ऐ) ला माहीत होते ते त्याने कपटपणाने जवळ बाळगल्याचा त्याच्यावर आरोप आहे. चलन नकली आहे की नाही याबाबत आपणांस संशय आल्यामुळे आपण एका कुशल व्यक्तीला ते पारखण्यास सांगितले होते व त्या व्यक्तीने त्याची पारख करुन ते खरे असल्याचे आपणांस सांगितले होते, हे शाबीत करण्याची तो तयारी दाखवतो. (ऐ) ला ही तथ्ये शाबीत करता येतील.