Bsa कलम १७ : ज्या व्यक्तींचे दाव्यातील पक्षकारांच्या संबंधातील स्थान शाबीत केले पाहिजे त्यांनी दिलेल्या कबुल्या :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १७ :
ज्या व्यक्तींचे दाव्यातील पक्षकारांच्या संबंधातील स्थान शाबीत केले पाहिजे त्यांनी दिलेल्या कबुल्या :
ज्या व्यक्तीचे स्थान किंवा दायित्व दाव्यातील कोणत्याही पक्षकाराच्या संबंधात शाबीत करणे जरूर असते त्यांनी केलेली कथने जर त्यांनी किंवा त्यांच्याविरूद्ध केलेल्या दाव्यात अशा स्थानाच्या किंवा दायित्वाच्या संबंदात अशा व्यक्तीविरूद्ध संबद्ध असतील व जर ती कथने करणारी व्यक्ती अशा स्थानी असताना किंवा अशा दायित्वास अधीन असताना ती केलेली असतील तर, अशी कथने म्हणजे कबुल्या होत.
उदाहरण :
(ऐ) हा (बी) करता भाडे वसूल करण्याचे काम पत्करतो. (सी) कडून (बी) ला येणे असलेले भाडे वसूल न केल्याबद्दल (बी) हा क विरुद्ध दावा लावतो. (सी) कडून (बी) ला भाडे येणे असल्याचे (ऐ) नाकबूल करतो. आपण (बी) ला भाडे देणे लागतो असे (सी) ने केलेले कथन ही कबुली आहे, व (सी) हा (बी) ला भाडे देणे लागत होतो हे (ऐ) ने नाकबूल केले तर, पूर्वोक्त कबुली हे (ऐ) विरुद्ध संबद्ध तथ्य आहे.

Leave a Reply