भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १६ :
कार्यवाहीतील पक्षकाराची किंवा त्याच्या प्रतिनिधीची कबुली :
१) कार्यवाहीतील पक्षकाराने केलेली कथने किंवा अशा कोणत्याही पक्षकाराने स्पष्टपणे किंवा उपलक्षणेने आपल्या ज्या अभिकत्र्याला अशी कथने करण्यास प्राधिकृत केले आहे असे न्यायालय त्या प्रकरणातील परिस्थितीत मानील त्याने केलेली कथने म्हणजे कबुल्या होत.
२) जी कथने –
एक) दाव्यातील ज्या पक्षकारांनी प्रतिनिधी म्हणून दावा लावला असेल किंवा प्रतिनिधी म्हणून ज्या पक्षकारांविरूद्ध दावा लावला गेला असेल त्यांनी केलेली कथने, ती करणारा पक्षकार त्या भूमिकेत असताना केलेली नसतील तर, कबुली होत नाहीत; किंवा
दोन) (a) क) कार्यवाहीच्या विषयवस्तूत ज्यांचा स्वामित्वविषयक किंवा द्रव्यविषयक हितसंबंध असून याप्रमाणे हितसंबंधित असलेल्या व्यक्ती म्हणून ज्या कथन करतात त्या व्यक्तींनी; किंवा,
(b) ख) दाव्यातील पक्षकारांनी दाव्याच्या विषयवस्तूमधील आपला हितसंबंध ज्यांच्याकडून प्राप्त केला त्या व्यक्तींनी, केली असतील ती कथने जर ती करणाऱ्या व्यक्तींचा हितसंबंध अस्तित्वात असताना केलेली असतील तर,
अशी कथने म्हणजे कबुल्या होत.