भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २५८ :
दोषमुक्ती किंवा दोषसिध्दी यांचा न्याय निर्णय :
१) युक्तिवाद आणि कोणतेही कायदेविषयक मुद्दे असल्यास ते ऐकल्यानंतर, न्यायाधीश शक्य तिक्या लवकर, युक्तिवाद पूर्ण झाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या कालवधीत त्या खटल्यातील न्यायनिर्णय देईल, ज्याची मुदत कारणे लेखी नमुद करुन पंच्चेचाळीस दिवसांपर्यंत वाढविली जाऊ शकेल.
२) जर आरोपी सिध्ददोष ठरला आणि न्यायाधीशाने कलम ४०१ च्या उपबंधांनुसार कार्यवाही केली नाही तर एरव्ही तो शिक्षेच्या प्रश्नावर आरोपीचे म्हणणे ऐकून घेईल आणि नंतर कायद्यानुसार त्याला शिक्षा ठोठावील.