भारतीय दंड संहिता १८६०
कलम २६३ :
मुद्रांक वापरण्यात आलेला असल्याचे दर्शविणारी खुण खोडून टाकणे :
(See section 185 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मुद्रांक वापरण्यात आलेला असल्याचे दर्शविणारी खूण खोडून टाकणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
कपटीपणाने किंवा शासनास हानी पोचवण्याच्या उद्देशाने जो कोणी महसूलाच्या प्रयोजनार्थ (कारणाकरिता) शासनाद्वारे पुर:सृत (काढलेला) असा मुद्रांक वापरण्यात आलेला आहे हे दर्शविण्यासाठी अशा मुद्रांकावर जी कोणतीही खुण लावली असेल किंवा जिचा ठसा मारला असेल ती त्यावरून खोडून किंवा काढून टाकील अथवा ज्याच्यावरुन अशी खून खोडण्यात किंवा काढून टाकण्यात आलेली आहे असा कोणताही मुद्रांक जाणीवपूर्वक आपल्या कब्जात बाळगील अथवा जो वापरण्यात आला असल्याचे स्वत:ला माहीत आहे अशा कोणत्याही मुद्रांकाची विक्री करील किंवा वासलात लावील तर त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
