Ipc कलम २०१ : अपराध्याला वाचवण्यासाठी अपराधाचा (गुन्हयाचा) पुरावा नाहीसा होण्याची तजवीज करणे किंवा खोटी माहिती देणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २०१ :
अपराध्याला वाचवण्यासाठी अपराधाचा (गुन्हयाचा) पुरावा नाहीसा होण्याची तजवीज करणे किंवा खोटी माहिती देणे :
(See section 238 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्यासाठी पुरावा नाहीसा होण्याची तजवीज करणे किंवा त्यासंबंधी खोटी माहीती देणे अपराध देहांतदंड असल्यास.
शिक्षा :७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :ज्या अपराधासंबंधात पुरावा नाहीसा केलेला आहे तो दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
————-
अपराध : आजीवन कारावासाच्या किंवा १० वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
————-
अपराध : १० वर्षाहून कमी कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास.
शिक्षा :अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या एक चतुर्थांशाइतका करावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :अपराध ज्या न्यायालयात विचारणीय योग्य असेल ते न्यायालय.
————-
जो कोणी अपराध घडला आहे हे माहीत असून, किंवा तसे समजण्यास कारण असून अपराध्याला वैध (कायदेशीर) शिक्षेपासून वाचवण्याच्या उद्देशाने तो अपराध करण्यात आल्याचा कोणताही पुरावा नाहीसा होण्याची तजवीज करील अगर त्या उद्देशाने, खोटी असल्याचे स्वत:स माहीत आहे किंवा तसे तो स्वत: समजतो, अशी त्या अपराधाविषयी खोटी माहिती देईल तर त्याला,
अपराध देहांतदंड्य (फाशी) असल्यास :
जो अपराध घडल्याचे त्यास माहीत आहे किंवा तसे तो समजो तो अपराध मृत्यूच्या शिक्षेस पात्र असेल तर, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल;
आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास :
आणि अपराध जर १.(आजन्म कारावासाच्या) शिक्षेस अगर दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कारावासास पात्र असेल तर, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
दहा वर्षाहून कमी कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास :
आणि अपराध जर दहा वर्षेपर्यंत नसलेल्या इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल तर, त्या अपराधासाठी उपबंधित (दर्शविलेल्या) केलेल्या शिक्षेच्या सर्वाधिक मुदतीच्या १/४ पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या वर्णनाची कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरण :
(ख) ने (य) चा खून केला आहे हे माहीत असून (ख) ला शिक्षेपासून वाचवण्याच्या उद्देशाने (क) हा (ख) ला तो मृतदेह लपवण्याच्या कामी मदत करतो. (क) सात वर्षे मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासास आणि द्रव्यदंडासही पात्र आहे.
———-
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप किंवा काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply