भारतीय दंड संहिता १८६०
कलम १८३ :
लोकसेवकाच्या कायदेशीर प्राधिकारान्वये (अधिकाराप्रमाणे) मालमत्ता ताब्यात घेतली जाण्यास प्रतिकार करणे :
(See section 218 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाच्या कायदेशीर प्राधिकारान्वये मालमत्ता ताब्यात घेतली जाण्यास प्रतिकार करणे.
शिक्षा :६ महिन्याचा कारावास किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
———
कोणत्याही लोकसेवकाच्या कायदेशीर अधिकारप्रमाणे मालमत्ता ताब्यात घेतली जात असता तो लोकसेवक आहे हे माहीत असून किंवा तसे समजण्यास कारण असून जो कोणी कोणत्याही प्रकारे प्रतिकार करील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.