Ipc कलम १८१ : शपथ घेववण्यास किंवा दृढकथन करुन घेण्यास प्राधिकृत असलेला लोकसेवक अगर अन्य व्यक्ती यांच्या समोर शपथ घेऊन किंवा दृढकथन करून खोटे कथन करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १८१ :
शपथ घेववण्यास किंवा दृढकथन करुन घेण्यास प्राधिकृत असलेला लोकसेवक अगर अन्य व्यक्ती यांच्या समोर शपथ घेऊन किंवा दृढकथन करून खोटे कथन करणे :
(See section 216 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जे खोटे आहे ते लोकसेवकाला समजूनसवरुन शपथेवर खरे म्हणून सांगणे.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
शपथ घेवविण्यास १.(किंवा दृढकथन) करून घेण्यास विधित: (कायद्याने) प्राधिकृत (अधिकार असलेला) असा कोणताही लोकसेवक किंवा अन्य कोणी व्यक्ती यांच्यासमोर कोणत्याही विषयासंबंधी सत्यकथन करण्यास स्वत: अशा शपथेने १.(अगर दृढकथनाने) विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असून जो कोणी त्या विषयासंबंधी जे खोटे आहे अगर जे खोट असल्याचे माहीत आहे किंवा तसे तो समजत आहे अथवा जे खरे आहे असे तो समजत नाही असे कोणतेही कथन पूर्वोक्त (वरील) लोकसेवक अगर अन्य व्यक्ती यांच्यासमोर करील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची कारावासाची शिक्षा होईल, आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
———-
१. १८७३ चा अधिनियम १० कलम १५ द्वारे समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply