भारतीय दंड संहिता १८६०
कलम १६६ ब :
१.(पीडित व्यक्ती चा उपचार न केल्यास शिक्षा :
(See section 200 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : पीडित व्यक्तीवर रुग्णानलयांनी उपचार न करणे.
शिक्षा : १ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———-
जो कोणी, सरकारी किंवा खाजगी रूग्णालयाचा, -मग ते केंद्र शासनाकडून चालविण्यात येत असो, राज्य शासनाकडून चालविण्यात येत असो, स्थानिक मंडळाकडून चालविण्यात येत असो किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून चालविण्यात येत असो – प्रभारी असताना, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २ ) याच्या कलम ३५७ क च्या तरतुदीचे उल्लंघन करील, त्याला एक वर्षापर्यंंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील.)
———
१. सन २०१३ चा फौजदारी कायदे (सुधारणा ) अधिनियम क्र.१३ द्वारे घातला.